नवी दिल्ली/ मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासात ७९ हजार ४७६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६४ लाख ७३ हजार ५४५ वर पोहचली आहे. तर शुक्रवारी १ हजार ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखांहून अधिक झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या देशात ९ लाख ४४ हजार ९९६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ५४ लाख २७ हजार ७९७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात १३,२९४ रुग्ण झाले कोरोनामुक्त-
राज्यात शुक्रवारी दिवसभरात १५ हजार ५९१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने आतापर्यंतची रुग्णसंख्या १४ लाख १६ हजार ५१३ झाली आहे, तर दिवसभरात १३ हजार २९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ लाख १७ हजार ७२० झाली आहे.
चाचण्यांची संख्या सात कोटी ७८ लाखांवर
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी ११,३२,६७५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशभरात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ७,७८,५०,४०३ आहे.
२०३ दिवसांत एकावरून एक लाखांवर पोहोचली बळींची संख्या
३०.९४ % इतका उच्चांकी मृत्युदर भारताने ३ एप्रिल रोजी गाठला होता. तो आता १.५६ टक्के इतका कमी ठेवण्यात भारताला यश आले आहे.