शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

CoronaVirus News: ९५ वर्षांच्या कोरोनाबाधित आजीबाई झाल्या पूर्ण बऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 4:53 AM

केरळमधीलच अनुक्रमे ९३ व ८८ वर्षांचे एक कोरोनाबाधित दाम्पत्य गेल्या महिन्यात पूर्णपणे बरे होऊन घरी गेले होते.

करुर (केरळ) : येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात तीन आठवड्यांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या ९५ वर्षांच्या एका कोरोनाबाधित आजीबार्इंना पूर्ण बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. पूर्णपणे बरा झालेला देशातील हा सर्वाधिक वयाचा कोराना रुग्ण असावा, असे येथील डॉक्टरांना वाटते. केरळमधीलच अनुक्रमे ९३ व ८८ वर्षांचे एक कोरोनाबाधित दाम्पत्य गेल्या महिन्यात पूर्णपणे बरे होऊन घरी गेले होते.नमक्कल आणि दिंडीगल या दोन शेजारी जिल्ह्यांमधील कोरोनाचे रुग्ण करुर येथील इस्पितळात दाखल केले जातात. बरी झालेली ही ९५ वर्षांची वृद्धा दिंडीगल जिल्ह्यातील होती. बºया झालेल्या एकूण पाच रुग्णांना बुधवारी सायंकाळी घरी पाठविण्यात आले. त्यात तिचा समावेश होता.या वृद्धेचा मुलगा सैयद इब्राहीम याने सांगितले की, आमच्या शेजारचा एक मुलगा दिल्लीहून तबलगी जमातच्या कार्यक्रमाला जाऊन परत आला. तेथून आलेले बरेचजण कोरानाग्रस्त झाल्याचे कळल्यानंतर आम्ही घरातील सर्वांनी जाऊन चाचण्या करून घेतल्या. आई वगळता इतर सर्वांच्या चाचण्या ‘निगेटिव्ह’ आल्या. इब्राहिम म्हणाला की, घरातील फक्त आईलाच कोरोनाचा संसर्ग व्हावा याचे आश्चर्य वाटते.इस्पितळाचे अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. तेरानीरंजन म्हणाले की, या आजीबार्इंचे मनोधैर्य नक्कीच कौतुक करण्यासारखे आहे. त्या मनाने खंबीर राहिल्या व कोणतीही कुरकूर न करता त्यांनी उपचार करून घेतले म्हणूनच त्या लवकर बºया झाल्या.>या आजारातून पूर्ण बरी होईन, असा मला पूर्ण आत्मविश्वास होता. घरातील सर्व आणि डॉक्टर व अन्य कर्मचारी माझी आस्थेने काळजी घेत होते. त्यामुळे मला बिलकूल चिंता किंवा भीती वाटली नाही.-बºया झालेल्या आजीबाई