नवी दिल्ली : भारतात आता अवघे तीन लाख सक्रिय रुग्ण आहेत. या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या ९६ लाखांपेक्षा अधिक असून, मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे. जगात दर दहा लोकांमागे कमी कोरोना बळी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतात दर दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे १०५.४ जणांचा बळी गेला आहे. जगभरात ७ कोटी ७२ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ५ कोटी ४१ लाख जण बरे झाले आहेत. भारतामध्ये अमेरिकेपेक्षा सक्रिय रुग्ण, बळींची संख्या कमी आहे.अमेरिकेत १ कोटी ६ लाखलोक झाले बरे अमेरिकेत १ कोटी ८२ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील १ कोटी ६ लाख जण बरे झाले आहेत. या संसर्गाने अमेरिकेत ३ लाख २४ जणांचा बळी घेतला असून, तेथे ७३ लाख सक्रिय रुग्ण आहेत.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कोरोनाचे २४,३३७नवे रुग्ण सापडले. २५,७०९जण बरे झाले.