अहमदाबाद: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या आठवड्याभरपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे देशाच्या अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याची परिस्थिती आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कोरोना रुग्णाला ३ दिवस ऑक्सिजन बेड मिळाला नाही. त्यामुळे ३ दिवस त्याचे नातेवाईक त्याच्यासोबत ऑक्सिजन सिलिंडर घेऊन बेडच्या शोधात फिरत होते....'त्या' व्यक्तींना कोरोना लसीचा एकच डोस पुरेसा; दुसऱ्या डोसची गरजच नाही५० वर्षीय हरेश परमार यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. हरेश यांना नीट चालताही येत नव्हतं. त्यांच्यासोबत त्यांचे तीन नातेवाईक होते. एकानं ऑक्सिजन सिलिंडर धरला होता. दुसऱ्यानं ड्रिप बॉटल पकडली होती. तर तिसऱ्याच्या हातात युरिन बॅग होती. आम्ही तीन दिवसांपासून याच परिस्थितीत आहोत, अशी माहिती हरेश यांचा पुतण्या अक्षयराजनं दिली.कोरोनाची दुसरी लाट मे अखेरीस ओसरणार; महाराष्ट्रापासूनच होणार सुरुवात'हरेश परमार राजकोटपासून २७ किलोमीटरवर असलेल्या लोधिडा गावात वास्तव्यास आहेत. सहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. तिसऱ्या दिवशी त्यांना श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण ८० टक्क्यांच्या खाली गेलं. आम्ही त्यांना जवळपास असलेल्या सगळ्याच खासगी आणि सरकारी रुग्णालयांत घेऊन गेलो. मात्र कुठेही आम्हाला ऑक्सिजन बेड मिळाला नाही,' अशी व्यथा अक्षयराज यांनी मांडली.तीन नातेवाईक मोठ्या आशेनं हरेश यांना घेऊन अहमदाबादला आले. 'आमचे एक दूरचे नातेवाईक इथल्या सिव्हिल रुग्णालयात दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच इथले बेड वाढवण्यात आल्याची माहिती त्यांनी आम्हाला दिली. त्यानंतर आम्ही वेळ न दवडता लगेचच रुग्णालय गाठलं. दोन ऑक्सिजन सिलिंडर घेऊन आम्ही रुग्णालयात पोहोचलो. आम्हाला कित्येक तास वाट पाहावी लागली. पण अखेरीस बेड मिळाला,' अशी माहिती अक्षयराज यांनी दिली.
CoronaVirus News: गुजरात मॉडेल? कोरोना रुग्णासह ऑक्सिजन सिलिंडर घेऊन नातेवाईकांची ३ दिवस वणवण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 9:55 AM