शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

CoronaVirus News : एअर इंडियाची देशांतर्गत विशेष विमान सेवा सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 1:55 PM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : एअर इंडियाची मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद आणि विजयवाडा येथे विशेष उड्डाणे असणार आहेत.

ठळक मुद्देचेन्नईसाठी एका विमानाचे उड्डाण होणार आहे. हे विमान कोची-चेन्नईसाठी १९ तारखेला उड्डाण करणार आहे.एअर इंडियाची मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद आणि विजयवाडा येथे विशेष उड्डाणे असणार आहेत.

चेन्नई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहेत. या लॉकडाऊनमध्ये विविध राज्यांत अनेक लोक अडकून पडले आहेत. अशा अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी एअर इंडिया १९ मे पासून २ जूनपर्यंत स्पेशल देशांतर्गत विमान उड्डाणे सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही विमान उड्डाणे जास्तकरून दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु येथून होणार आहेत.

चेन्नईसाठी एका विमानाचे उड्डाण होणार आहे. हे विमान कोची-चेन्नईसाठी १९ तारखेला उड्डाण करणार आहे. दिल्लीसाठी १७३, मुंबईसाठी ४०, हैदराबादसाठी २५ आणि कोचीसाठी १२ विमान उड्डाणे होणार आहेत. दिल्लीहून विमान उड्डाणे जयपूर, बंगळुरु, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनऊ आणि इतर दुसऱ्या शहरांसाठी असणार आहेत.

एअर इंडियाची मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद आणि विजयवाडा येथे विशेष उड्डाणे असणार आहेत. याशिवाय हैदराबादहून मुंबई आणि दिल्ली येथेही उड्डाणे होणार आहेत. बंगळुरुहून मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथेही उड्डाणे असतील. याशिवाय भुवनेश्वरचे विमानही बंगळुरुला येणार आहे.

वंदे भारत मिशन: आतापर्यंत ६०३७ भारतीय मायदेशात परतलेजगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये विविध देशांत अनेक भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालयाने 'वंदे भारत मिशन' मोहीम सुरू केली आहे. 'वंदे भारत मिशन' अंतर्गत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसला ७ मे २०२० पासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ३१ उड्डाणे करत ६०३७ भारतीयांना मायदेशात परत आणण्यात यश आले, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने सांगितले. 

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस 'वंदे भारत मिशन' अंतर्गत १२ देशांमध्ये ६४ विमान उड्डाणे करीत आहे. यामध्ये एअर इंडियाची ४२ उड्डाणे आणि २४ उड्डाणे एअर इंडिया एक्स्प्रेस करत आहे. या १२ देशांमध्ये अमेरिका, लंडन, बांगलादेश, सिंगापूर, सौदी अरेबिया, कुवैत, फिलिपिन्स, युएई आणि मलेशियाचा समावेश आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशात अडकलेल्या १४,८०० भारतीयांना पहिल्या टप्प्यात परत आणले जाईल.  

आणखी बातम्या...

CoronaVirus News : बापरे! ज्याच्या घरात चोरी केली तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मग...

CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट

CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"

CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...

CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाcorona virusकोरोना वायरस बातम्या