नवी दिल्ली : रस्त्यावर मजूर पाहून कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेली यंत्रणा फेल झाल्यासारखे वाटते, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले, "मजुरांनी दिल्ली सोडून जाऊ नये, अशी मी त्यांना विनंती करतो. जर तुम्ही अडकले आहात आणि तुमची घरी जाण्याची इच्छा आहे, तर आम्ही ट्रेनची व्यवस्था करीत आहोत. बिहार, मध्य प्रदेशला रेल्वेगाड्या गेल्या आहेत. अजून थोडावेळ वाट पाहा, पण पायी चालत जाऊ नका."
याचबरोबर, राजधानी दिल्लीत कोरोनामुळे जास्तकरून वयस्कर लोकांचा मृत्यू होत आहे. मृतांपैकी ८२ टक्क्यांमध्ये ५० हून अधिक वय असलेले लोक आहेत. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या ६९२३ इतकी आहे. तर ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास १५०० लोकांना रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यातील ९१ जण आयसीयूमध्ये आहेत. शिवाय, आतापर्यंत २०९१ लोक या आजारातून बरे झाले आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
दिल्लीत कोरोनाची फार कमी गंभीर प्रकरणे आहेत. कोरोनाची लक्षणे कमी असलेल्या रूग्णांच्या घरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य टीम पाठविण्यात येत आहे. कोरोना वॉरियर्सला लागण झाल्यास त्यांना फाइव्ह स्टारमध्ये उपचारांची व्यवस्था केली जाईल, यासाठी आदेश मंजूर केला. मात्र, याला विरोधकांनी विरोध केल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले.
तसेच, कोरोना वॉरियर्सला विशेष सुविधा मिळावी की नाही? निधनावर जर आपण एक कोटी रुपये देत आहोत तर मग काय अडचण आहे? ही वेळ राजकारण करण्याची नाही, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आणखी बातम्या...
भारत-चीन सैनिकांमध्ये संघर्ष, सीमेवर काहीकाळ तणावाची परिस्थिती
CoronaVirus : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बराक ओबामा भडकले; फोन कॉल लीक
पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली
CoronaVirus: कोरोनावर लस तयार करण्याच्या भारत फक्त एक पाऊल दूर; प्राण्यांवर होणार ट्रायल