नवी दिल्ली : जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहे. यासंदर्भात नागरी उड्डाण संचालनालयाने परिपत्रक जारी केले आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्र सरकारने देशातील कोरोनाचा परिस्थितीचा आढावा घेऊन अनलॉक-4 मध्येही आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयानंतर नागरी उड्डाण संचालनालयाने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे परिपत्रकाद्वारे म्हटले आहे. तसेच, सक्षम प्राधिकरणाद्वारे ठरविण्यात आलेल्या मार्गांवर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीला परवानगी दिली जाऊ शकते, असेही यामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचा धोका वाढला असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील रुग्णांचा आकडा 36,21,246 वर पोहोचला असून कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 64,469 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 78,512 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 971 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताच 24 तासांत 31 टक्के रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. मात्र मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. पण याच दरम्यान कोरोनाचा धडकी भरवणारा वेगही समोर आला आहे. कोरोनाची लक्षणं जाणवत नसतानाही अनेकांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह येत आहे. वेळीच कोरोनाचा धोका लक्षात न आल्यामुळे तसेच वेळेत उपचारासाठी दाखल न झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे.
आणखी बातम्या...
- फ्री ट्रायलसोबत JioFiber चे नवे प्लॅन लाँच, OTT अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळणार
- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा
- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम
- 'पिया तू अब तो आजा...' या गाण्यावर वृद्ध महिलांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
- सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता
- आश्चर्यकारक! क्वारंटाइन सेंटरमध्ये ५८० रुपयांना खरेदी केले एक किलो टोमॅटो
- 'या' फोटोने आनंद महिंद्रांचे जिंकले मन; नितीन गडकरींना केली विनंती अन् म्हणाले...
- काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...
- धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं
- अॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर
- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा
- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार