शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

CoronaVirus News: पत्नीचा हट्ट 'कामी' आला, मृत नवरा जिवंत झाला; अंत्यसंस्कार होणार इतक्यात... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 3:39 PM

CoronaVirus News: रुग्णालयाचा भोंगळ कारभार; जिवंत व्यक्तीच्या नावानं दिलं मृत्यू प्रमाणपत्र

पाटणा: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. मार्चपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं सारे रेकॉर्ड ब्रेक केले. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सावळागोंधळ पाहायला मिळत आहे."४० तासांपासून स्मशानभूमीबाहेर रांगेत उभा आहे; पण वडिलांचे अंत्यसंस्कार होत नाहीएत"बिहारमधल्या पाटणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (पीएमसीएच) एक धक्कदायक घटना घडली आहे. एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून त्याचं मृत्यू प्रमाणपत्रदेखील तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पीएमसीएचमधील एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाढ जिल्ह्यातल्या मोहम्मदपूरचा रहिवासी असलेल्या चुन्नू कुमारचं ब्रेन हॅम्रेज झालं. त्यानंतर त्याला पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याची कोरोना चाचणी केली गेली. ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना कोरोना वॉर्डमध्ये हलवण्यात आलं.याला काय म्हणावं! नर्स राहिली बसून; अधिकाऱ्यानं सरपंचाला लस दिली टोचूनउपचारादरम्यान चुन्नू कुमारची प्राणज्योत मालवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून रविवारी त्याची पत्नी आणि भावाला देण्यात आली. त्यानंतर रुग्णालयानं घाईघाईत मृतदेह चुन्नूचा भाई मनोज कुमारकडे सोपवला आणि मृत्यू प्रमाणपत्रदेखील दिलं. प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली अंत्यसंस्कार सुरू असताना चुन्नूच्या पत्नीनं पतीचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पत्नी हट्टाला पेटल्यानं मृतदेहावरील कपडा हटवण्यात आला. त्यावेळी तो मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं पत्नी आणि कुटुंबियांच्या लक्षात आलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला.यानंतर पीएमसीएचमध्ये खळबळ उडाली. सध्या पीएमसीएचमध्ये चुन्नू यांच्यावर उपचार सुरू आहेत. पीएमसीएच प्रशासन आणि चुन्नू यांच्या कुटुंबियांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. व्यक्ती जिवंत असताना त्याच्या नावे मृत्यू प्रमाणपत्र जारी करणं ही गंभीर स्वरुपाची चूक असल्याचं पीएमसीएचचे अधिष्ठाता डॉ. आय. एस. ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्यांनी आरोग्य व्यवस्थापिका अंजली कुमारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या