लखनऊ: देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली असून भाजपा आमदार केसर सिंह गंगवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदाराला २४ तास ICU बेड मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे. आता, या आमदारांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. १८ एप्रिल रोजी त्यांनी हे पत्र लिहिलं होतं.लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो कशाला? माजी प्राध्यापकाची तक्रार; लस घेण्यास स्पष्ट नकारकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र याच दरम्यान रुग्णालयात बेड्स आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाही वेळेत बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी रुग्णालयात असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालं आहे. त्यामध्ये, आपल्याला बेड मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मृत्यूनंतर भाजपा आमदाराचं पत्र व्हायरल, आरोग्यमंत्र्यांकडे मागितली होती मदतकेसर सिंह गंगवार यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा विशालनं एक फेसबुक पोस्ट लिहून सरकारबद्दल रोष व्यक्त केला. 'हेच का उत्तर प्रदेश सरकार? त्यांना आपल्याच आमदारावर उपचार करता येत नाहीत. मी कित्येकदा मुख्यमंत्री कार्यालयाला फोन केले. पण कोणाची टाप आहे फोन उचलण्याची. धन्य ते यूपी सरकार, धन्य ते मोदीजी!' अशा शब्दांत विशाल यांनी सरकारबद्दल संताप व्यक्त केला. त्यांच्या फेसबुक पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
१८ एप्रिलला गंगवार कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सुरुवातीला त्यांना बरेलीच्या राममूर्ती मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण, त्यांना २४ तासांपर्यंत एक आयसीयू बेड मिळाला नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांना नोएडातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मात्र, १८ एप्रिल रोजीच या आमदारांनी डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून परिस्थिती कळवली होती. तसेच, मला बेड उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही केली होती.