- अतुल कुलकर्णीमुंबई : ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे त्या राज्याला कोरोना लसीचे १७ लाख ४३ हजार २८० डोस तर ज्या गुजरातची लोकसंख्या ६ कोटी आहे त्या राज्याला मात्र १५ लाख ५७ हजार ८७० डोस येत्या पाच दिवसात मिळणार आहेत. केंद्र सरकारचा लस वाटपातील हा पक्षपात केवळ महाराष्ट्रापुरता नाही. भाजपशासित राज्यांना अधिक तर अन्य राज्यांना कमी लस देण्यात येत आहेत. यासंदर्भातील बोलकी आकडेवारीच समोर आली आहे. येत्या १५ ते २० एप्रिल या पाच दिवसात कोणत्या राज्याला किती लस द्यायच्या, याचे नियोजन केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केले आहे. ती यादी हाती आली आहे. भाजपची सत्ता ज्या राज्यांत आहे, तेथे रुग्ण संख्या किती, लोकसंख्या किती याचा कोणताही आढावा न घेता त्या राज्यात मोठ्या प्रमाणात लस पुरवण्याचे नियोजन आहे, तर ज्या राज्यात विरोधी पक्षांची सत्ता आहे त्या राज्यांची लोकसंख्या आणि त्यांना दिलेले डोस पाहिले तर केंद्राने लस वाटपात केलेला पक्षपात स्पष्टपणे समोर येत आहे. भाजपशासित राज्यांना मिळणारे डोस : (१५ ते २० एप्रिल)राज्य लोकसंख्या किती डोस मिळणारउत्तरप्रदेश १९.९५ कोटी ४४,९८,४५०मध्य प्रदेश ७.२५ कोटी ३३,७६,२२०कर्नाटक ५.२८ कोटी २९,०६,२४०हरियाणा २.५३ कोटी २४,६८,९२०गुजरात ६.८६ कोटी १५,५७,८७०भाजपशासित नसलेल्या राज्यांना मिळणारे डोसराज्य लोकसंख्या किती डोस मिळणारमहाराष्ट्र ११.२३ कोटी १७,४३,२८०आंध्रप्रदेश ४.९३ कोटी १०,५८,१७०छत्तीसगड २.७९ कोटी ६,८४,२९०केरळ ३.१८ कोटी ४,७४,७१०राजस्थान ६.८६ कोटी ३,८३,२६०कोणत्या राज्यात किती टक्के वॅक्सिंन वाया गेले? (अधिकृत आकडेवारी नुसार)तेलंगणा - १७.५%आंध्र प्रदेश - ११.५%उत्तर प्रदेश - ९.४%कर्नाटक - ६.९%जम्मू काश्मीर - ६.५%राजस्थान - ५.६%आसाम - ५.५%गुजरात - ५.३%पश्चिम बंगाल - ४.१%महाराष्ट्र - ३.२%वरील आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या लसीवरून ३.२% वेस्टेज इतर राज्यांच्या तुलनेने फार कमी आहे.दररोज ३४ लाख लोकांचे लसीकरण; मोहीम एका दृष्टिक्षेपात देशात दररोज सरासरी ३४ लाख ३० हजार ५०२ लसींचे डोस दिले जात आहेत. आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले की, आतापर्यंत सरासरी ९ कोटी ०१ लाख ९८ हजार ६७३ डोस देण्यात आलेआहेत. देशात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच कोरोनायोद्धे आणि ६० वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याचे ठरले.७ एप्रिल रोजी देशव्यापी लसीकरण मोहिमेला ८२ दिवस पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत झालेले लसीकरण९,०१,९८,६७३६० वर्षांपुढील व्यक्तींनी घेतलेला पहिला डोस३,६३,३२,८५१६० वर्षांपुढील व्यक्तींनी घेतलेला दुसरा डोस ११,३९,२९१गेल्या २४ तासांत वितरित करण्यात आलेले डोस३४,३०,५०२४५ ते ६० वर्षे, पहिला डोस२,३६,९४,४८७४५ ते ६० वर्षे वयाच्या व्यक्तींचा दुसरा डोस४,६६,६६२
Corona Vaccination: लसीकरणात राजकारण! मोदी सरकारच्या पक्षपातामुळे महाराष्ट्रावर अन्याय; पाहा आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 5:58 AM