नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनाचा वेगाने होत असलेला फैलाव पाहता ५० उच्च पातळीवरील सार्वजनिक आरोग्य तुकड्या स्थापन केल्या असून, त्यांची नियुक्ती महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबमधील ५० जिल्ह्यांत केली आहे. या तिन्ही राज्यांत गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूही मोठ्या संख्येने वाढले आहेत.या तुकड्या महाराष्ट्रातील ३०, छत्तीसगडमधील ११ आणि पंजाबमधील नऊ जिल्ह्यांत जात असून त्या तेथे राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाला कोविड-१९ देखरेख, नियंत्रण आणि कंटेन्मेंटच्या उपाययोजनेत मदत करतील. दोन सदस्यांच्या उच्च पातळीवरील तुकडीत क्लिनिशियन- एपिडिमओलॉजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आहे. या तुकड्या ताबडतोब राज्यांना भेट देतील आणि कोविड-१९ व्यवस्थापनच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील. विशेषत: चाचण्या, देखरेख आणि कंटेन्मेंट ऑपरेशन्स, कोविड ॲप्रोप्रिएट बिहेविअर आणि त्याची अंमलबजावणी, रुग्णालयांत खाटांची उपलब्धता, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्स, प्राणवायूचा पुरवठा इत्यादींचा त्यात समावेश आहे.आरोग्य सामुग्रींचा अहवाल देणार! nभारत सरकारचे तीन ज्येष्ठ अधिकारी वरील तीन राज्यांसाठी नोडल अधिकारी नियुक्त केले गेले आहेत. गृहनिर्माण आणि नागरी कामकाज मंत्रालयातील जॉइंट सेक्रेटरी कुणक कुमार हे महाराष्ट्राचे नोडल अधिकारी आहेत. उच्च पातळीवरील तुकड्या या तीन राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय राखून त्यांना अहवाल देतील. nया तुकड्या राेजच्या रोज चाचण्या, काँटॅक्ट ट्रेसिंग, देखरेख आणि कंटेन्मेंट, रुग्णालयातील पायाभूत सुविधा, आयसीयू, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडस, लसीकरण या मुद्यांवर अहवाल सादर करतील.nकेंद्र सरकार कोविड-१९ व्यवस्थापनासाठी वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांशी समन्वय राखून लढत आहे. केंद्र सरकार वेळोवेळी केंद्रीय तुकड्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत पाठवत आहे. परिस्थितीची व आव्हानांची नेमकी माहिती मिळण्यासाठी या तुकड्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संपर्कात असतात. तसेच त्यांना कोणत्या अडचणी येत आहेत याची माहिती घेतात.
CoronaVirus News: महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाबला केंद्रीय तुकड्या भेट देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 5:19 AM