नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने परदेशातील भारतीय वंशाच्या ओव्हरसीज पारपत्र (पासपोर्ट) असलेल्या नागरिकांना काही अटींवर भारतात परतण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हजारो भारतीय नागरिकांना दिलासा मिळाला आहे.कोरोनाचा (कोविड-१९) प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकरने हवाई उड्डाणांवर बंदी घातली आहे. मात्र काही अटींवर भारतीय वंशाच्या नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. नातलगाचा मृत्यू झाल्यास त्यांना भारताचा प्रवास करता येईल. ओव्हरसीज पारपत्र असलेला अल्पवयीन मुलगा-मुलगीस आणि भारतीय वंशाच्या पती-पत्नी पैकी एकाकडे ओव्हरसीज पारपत्र असल्यास त्यांनाही भारतात परत येता येईल, असे परिपत्रक ओव्हरसीज पासपोर्ट विभागाचे संचालक प्रमोद कुमार यांनी प्रसिद्ध केले आहे.
CoronaVirus News : भारतीय वंशाच्या नागरिकांना देशात परतण्याची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 1:26 AM