नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या चौथ्या लाटेचा भारतावर कसा परिणाम होईल याबद्दल आतापर्यंत वेगवेगळी मतं समोर आली आहेत. कधी कोरोना रुग्णांची संख्या कमी होते तर कधी संख्या लक्षणीय वाढते. अशा परिस्थितीत कोरोनाचा चौथ्या लाटेचा भारतावर कितपत परिणाम होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या व्हायरसचा पराभव करण्यात भारत यशस्वी होईल की कोरोना पुन्हा आपली ताकद दाखवेल? याविषयी ज्योतिषी सचिन मल्होत्राचे यांचं काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया...
26 डिसेंबर 2019 रोजी सूर्यग्रहणानंतर कोरोना व्हायरसने चीनमधून पसरत येत मोठ्या महामारीचे रूप धारण केले. आता भारतीय अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवा कराची आकडेवारी यंदाच्या मंदीतून अर्थव्यवस्था सावरण्याचे संकेत देत आहे, तर काही तज्ज्ञ कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकट येण्याची भीती व्यक्त करत आहेत. केतू हा सजीव कारक ग्रह आहे. 'भद्रबाहू संहिता' म्हणते की, इतर प्रमुख ग्रहांची विशेषत: शनी आणि मंगळाची स्थिती जिवाणूजन्य रोगांची म्हणजेच महामारीचे संकेत देते.
26 डिसेंबर 2019 रोजी सूर्यग्रहणाच्या वेळी गुरू आणि केतू यांचा संयोग शनी, सूर्य इत्यादी ग्रहांशी होता, त्यानंतर कोरोनाने महामारीचे रूप धारण करण्यास सुरुवात केली. नंतर, मार्च 2020 नंतर गुरू, शनी आणि मंगळाच्या संयोगाने भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्था ठप्प झाली.
गेल्या वर्षी मार्च 2021 मध्ये वृषभ राशीतील राहूसोबत मंगळाच्या संक्रमणामुळे कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली होती, ज्यामुळे एप्रिल ते जून दरम्यान भारतात हाहाकार पाहायला मिळाला होता. मे 2021 मध्ये सूर्य, शुक्र आणि बुध राहूच्या संयोगात होते ज्यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला होता.
2021 च्या शेवटी डिसेंबर महिन्यात मंगळ वृश्चिक राशीत भ्रमण करत होता आणि केतूच्या संयोगाने वृषभ राशीत विराजमान असलेल्या राहूकडे दृष्टी होती, तेव्हा भारतात कोरोनाची तिसरी लाट 'ओमायक्रॉन'ने दार ठोठावले पण तो कमजोर राहिला कारण तोपर्यंत त्यानंतर गुरू मकर राशीतून मार्गक्रमण करत असताना त्याने कुंभ राशीत प्रवेश केला होता, त्यामुळे त्याचा शनीशी संबंध संपला होता.
सध्या गुरू मीन राशीत भ्रमण करत आहे तर राहू मेष राशीत भ्रमण करत आहे. सूर्य मेष राशीत राहून राहूशी संयोग साधत असल्याने काही ठिकाणी करोना संसर्गाची चौथी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून अशी शक्यता नाही. राहू-केतूसोबत दुसरा कोणताही मोठा ग्रह नसल्यामुळे भारतात या महामारीची चौथी लहर अद्याप तरी येणार नाही.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंगळ मेष राशीत प्रवेश करेल आणि राहूशी युती करेल. मंगळ 45 दिवस मेष राशीमध्ये राहील ज्या दरम्यान मुंबई, दिल्ली, बंगळुरू इत्यादी भारतातील प्रमुख शहरांमध्ये जुलै ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत कोरोनाची प्रकरणे थोडी वाढू शकतात परंतु चांगली गोष्ट अशी आहे की, त्यावेळी 'जीव कारक' ग्रह गुरू मीन राशीत राहील आणि कोणताही मोठा ग्रह त्यांच्यासोबत नसेल. अशा परिस्थितीत, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असेल आणि चौथ्या लाटेची शक्यता कमी असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.