शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

CoronaVirus News: ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्यानं कोरोना रुग्ण वैतागला, शेतात जाऊन बसला; अन् ३ दिवसांनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 1:26 PM

CoronaVirus News: ऑक्सिजन सिलिंडरसाठी अनेक प्रयत्न करूनही अपयशी; शेवटी तरुण शेतात निघून गेला

पानीपत: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्येत घट झाली आहे. मात्र तरीही धोका कायम आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक रुग्णांनी नोंद होत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर ताण आहे. त्यामुळे अनेकांना वेळेत उपचार मिळत नाहीत. हरयाणातील पानीपतमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला असाच अनुभव आला. धोका वाढला! कुत्र्यांमधूनही माणसांपर्यंत पोहोचतोय कोरोना विषाणू; नव्या माहितीनं खळबळकोरोनाची लागण झाल्यानं एका तरुणाच्या छातीत दुखू लागलं, त्याला श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या. प्रदीप सिंह असं या तरुणाचं नाव आहे. ऑक्सिजन सिलिंडरसाठी त्यानं बरेच प्रयत्न केले. मात्र ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्यानं आता जे होईल ते होईल अशा विचारानं प्रदीप शेतात जाऊन बसला. एका झाडाखाली त्यानं आश्रय घेतला. तीन दिवसांत त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी पूर्ववत झाली. दहा दिवसांत कोरोनावर मात करून तो अगदी ठणठणीत बरा झाला.मोठी बातमी! मेड इन इंडिया लस कोवॅक्सिनला धक्का; सीरमच्या कोविशील्डला दिलासागेल्या काही दिवसांपासून देशातील जवळपास सर्वच राज्यांत ऑक्सिजनसाठी धावाधाव पाहायला मिळत आहे. पानीपतमधील नंगला गावचा रहिवासी असलेल्या प्रदीप सिंहला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यानंही ऑक्सिजन सिलिंडर मिळवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. रुग्णालयांची अवस्था पाहून त्यांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. ऑक्सिजनची पातळी ८० पर्यंत घसरल्यावर प्रदीपसह त्याच्या नातेवाईकांनी सिलिंडरसाठी अनेकांना फोन केले. मात्र काही उपयोग झाला नाही.ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्यानं प्रदीप सिंह शेतात गेले. पुढील १० दिवस तो दररोज ८ ते १० तास झाडांखाली बसून असायचा. जेवणदेखील तो तिथेच घ्यायचा. तीन दिवसांत त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण सामान्य झालं. हळूहळू त्याच्या छातीतील वेदनादेखील कमी झाल्या. श्वास घेण्यातील अडचणी दूर झाल्यानं प्रदीपला आत्मविश्वास वाटू लागला. त्यानं कोरोना चाचणी करून घेतली. १३ मे रोजी प्रदीपनं केलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. अवघ्या १० दिवसांत निसर्गाच्या सानिध्यात राहून प्रदीपनं कोरोनावर मात केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या