नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे शनिवारी २५१ जण मरण पावले असून, गेल्या सहा महिन्यांतील हा नीचांक आहे. कोरोनातून ९७ लाख ४० हजार लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९५.७८ टक्के आहे. गेल्या तेरा दिवसांत दररोजच्या नव्या रुग्णांची संख्या तीस हजारांहून कमी आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.
गेल्या जुलै महिन्यापासून ते आतापर्यंत दररोज कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या आकडेवारीतील नीचांक शनिवारी नोंदविला गेला. देशात सलग पाचव्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून कमी आहे. शनिवारी सक्रिय रुग्णांचा आकडा २,८१,६६७ होता. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ८ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. त्यातील ५.६५ कोटी लोक कोरोनातून बरे झाले. अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या १.९२ कोटींपेक्षा अधिक आहे.