नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. जगभरातील कोरनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली असून तब्बल सहा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर आता देशातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 54,735 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 853 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 17 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 37,364 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (1 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 54,735 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 17,50,723 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 37 हजारांवर पोहोचला आहे.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 5,67,730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 11,45,629 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन हटवल्यानंतर कालपासून देशात अनलॉक-3 च्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. मात्र अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी काही राज्यांमध्ये कोरोनाच्या फैलावाने घेतलेल्या वेगाने सरकारची चिंता वाढवली आहे.
आणखी बातम्या....
बँक व्यवस्थापकाचा तयार केला बनावट कोरोना चाचणी अहवाल, तीन दिवसांनंतर मृत्यू
Sushant Singh Rajput death case: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली"
दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर
Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका
लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...
CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा