नवी दिल्ली: कोरोना झाल्यामुळे एम्समध्ये दाखल झालेल्या आणि आयसीयूमध्ये मृत पावलेल्यांमध्ये ५० पेक्षा कमी वय असलेल्यांचं प्रमाण अधिक असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. एम्सच्या आयसीयूमध्ये ज्येष्ठ नागरिकांपेक्षा तरुण जास्त प्रमाणात मृत्यूमुखी पडले आहेत. एम्सच्या अभ्यासातून ही चक्रावून टाकणारी बाब समोर आली आहे. एम्सच्या आयसीयूमध्ये कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या २२७ इतकी आहे. त्यातील ४२.१ टक्के रुग्ण १८ ते ५० वर्षे इतकी आहे. घाईघाईने निर्बंध उठवून धोका पत्करू नका; सात जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
एम्सच्या आयसीयूमध्ये शेवटचा श्वास घेतलेल्या ९४.७४ टक्के रुग्णांना एक किंवा एकापेक्षा अधिक गंभीर आजार होते. एम्सनं केलेल्या अभ्यासात कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या एकूण संख्येत ५० वर्षांखालील व्यक्तींचं प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती पुढे आली. '५० वर्षांखालील व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या गंभीर आजाराची समस्या असते. त्यांना असलेल्या गंभीर आजारामुळे मृत्यूचा धोका जास्त असतो,' असं तज्ज्ञांनी सांगितलं.बनावट लसीकरणातून २ हजार जणांची फसवणूक; हायकोर्टाला दिली माहिती, मुंबईतील प्रकार
एम्समध्ये ४ एप्रिल ते २४ जुलै या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला. एम्सच्या आयसीयूमध्ये एकूण ६५४ रुग्ण दाखल झाले होते. यातील २२७ जणांचा मृत्यू झाला. यातील ६५ टक्के पुरुष होते. मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं सरासरी ५६ इतकं होतं. मात्र १८ वर्षांच्या एका रुग्णाचादेखील मृत्यू झाला. तर ९७ वर्षांचा एका व्यक्तीचाही कोरोनामुळे जीव गेला.
'मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. ही बाब चक्रावून टाकणारी आहे. एकूण मृत्यूंची संख्या पाहिल्यास ४२.१ टक्के मृत्यू १८ ते ५० वयोगटातील आहेत. तर ३४.८ टक्के मृत्यू ५१ ते ६५ वयोगटातील आहेत. तर २३.१ टक्के मृत्यू ६५ च्या पुढील वयोगटातील आहेत,' अशी माहिती एम्सच्या ट्रॉमा केंद्राचे प्रमुख डॉ. राजेश मल्होत्रा यांनी दिली.