नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. चारच दिवसांपूर्वी देशात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा पहिल्यांदाच चार लाखांच्या पुढे गेला. त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली. मात्र ही घट फारशी लक्षणीय नाही. महाराष्ट्र, दिल्ली, पंजाबसह काही राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरीही धोका कायम आहे. त्यातच आता काही संशोधनांमधून कोरोनाचा धोका वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण दुपटीनं वाढू शकतं, असा धोक्याचा इशारा काही संशोधनांमधून पुढे आला आहे.कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करा अन् ५ हजार रुपये मिळवा!, जगन सरकारचा मोठा निर्णययेणाऱ्या काही दिवसांत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढू शकतो. सध्याच्या तुलनेत मृतांची संख्या दुपटीनं वाढू शकते, असा अंदाज बंगळुरूतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका टीमनं वर्तवला आहे. कोरोनाचे सध्याचे आकडे विचारात घेऊन गणिती प्रारुपाच्या आधारे त्याचं विश्लेषण करून टीमनं हा अंदाज वर्तवला. कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिल्यास ११ जूनपर्यंत भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा ४ लाख ४ हजारपर्यंत असेल, अशी शक्यता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या टीमनं व्यक्त केली.देवदूत! पंक्चर काढणाऱ्याने ६० वर्षीय नागरिकाने दिले ९० ऑक्सिजन सिलेंडर; रुग्णांना दिलासा जुलैच्या अखेरपर्यंत भारतात कोरोनामुळे १० लाख १८ हजार ८७९ रुग्णांचा मृत्यू होईल, असा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन इंन्स्टिट्यूटचा अंदाज आहे. भारतासारख्या देशात कोरोनासंदर्भात कोणताही अंदाज बांधणं अवघड आहे. कोरोना संकटात सोशल डिस्टन्सिंग, टेस्टिंग योग्य रितीनं झाल्यास बराच फरक पडतो. भारतात सध्याच्या घडीला अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. यामुळे अनेकांचे जीव जात आहेत, असं हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन इंन्स्टिट्यूटनं म्हटलं आहे.
CoronaVirus News: धोक्याचा इशारा! कोरोनाचा कहर वाढणार; जूनच्या मध्यावर मृतांचा आकडा ४ लाखांवर जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 5:29 PM