नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ६९,६५२ नवे रुग्ण आढळून आले असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २८ लाख ३६ हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्या आता २० लाख ९६ हजार झाली असून, अशा व्यक्तींचे प्रमाण ७३.९१ टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २८,३६,९२५ वर पोहोचली असून गुरुवारी ९७७ जण या आजाराने मरण पावले. त्यामुळे कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ५३,८६६ झाली आहे. मात्र, देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.९० टक्क्यांपर्यंत घटला आहे. या आजारातून बरे झालेल्यांची संख्या २०,९६,६६४ वर पोहोचली आहे. दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांचे वाढलेले प्रमाण, त्यामुळे रुग्णांचा लवकर लागणारा शोध व तातडीने होणारे उपचार यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी राखण्यात भारताला यश आले आहे.कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ६,१२३, कर्नाटकमध्ये ४,३२७, दिल्लीमध्ये ४,२३५, आंध्र प्रदेशमध्ये २,९०६, गुजरातमध्ये २८३७, उत्तर प्रदेशमध्ये २,६३८, पश्चिम बंगालमध्ये २,५८१ व मध्य प्रदेशमध्ये १,१५९ आहे. देशात सध्या ६,८६,३९५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ७ आॅगस्ट रोजी कोरोना रुग्णांची एकूण संख्या २० लाखांहून अधिक झाली होती.>लसीच्या साठेबाजीची चिंताजगभरात कोरोना लसीच्या चाचण्या सुरू असून, त्या यशस्वी झाल्यानंतरत्यांच्या संभाव्य साठेबाजीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोसअदनोम घेबियस यांनी चिंता व्यक्त केली आहे. श्रीमंत व विकसित देश कोरोनाची लस जास्त किमतीला खरेदी करून गरीब देशांना यापासून वंचितकरू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.
एकूण चाचण्या 3.26 कोटीइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १९ आॅगस्ट रोजी ९,१८,४७० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील चाचण्यांची एकूण संख्या आता ३,२६,६१,२५२ इतकी झाली आहे.