नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. मात्र तरीही देशातील अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. काही ठिकाणी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचं चित्र आहे. तर अनेक राज्यांमध्ये मृत्यूनंतरही हाल सुरू आहेत. दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयातून एका तरुणीचा मृतदेह गायब झाला आहे. गेल्या १० दिवसांपासून तरुणीचे भाऊ तिचा मृतदेह शोधत आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.तरुणीचा भाऊ सिद्धार्थनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० दिवसांपासून ते स्वत: मृतदेह शोधथ आहेत. शवागारात जाऊन त्यांनी प्रत्येक मृतदेहाचा चेहरा पाहिला. पण त्यांना अद्याप त्यांच्या बहिणीचा मृतदेह मिळालेला नाही. सिद्धार्थ यांच्या बहिणीच्या मृत्यूला महिना झाला आहे. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सिद्धार्थ मृतदेहाचा शोध घेत आहेत. सिद्धार्थ यांनी डॉक्टरांकडे जाऊन याबद्दल विचारणा केली. मृतदेहांची अदलाबदल झाल्याचं डॉक्टरांनी त्यांनी सांगितलं. पण ज्या मृतदेहासोबत बहिणीच्या मृतदेहाची अदलाबदल झाली, तो मृतदेहदेखील रुग्णालयाकडे नाही.१५ मे रोजी मी माझ्या बहिणीला नोएडातील एका रुग्णालयात घेऊन लोक नायक रुग्णालयात दाखल केलं, असं सिद्धार्थ यांनी सांगितलं. 'रुग्णालयात दाखल करताना बहिणीचा मृत्यू झाला. माझ्या घरात आई, वडील आणि एक भाऊ आहे. त्यावेळी आई, वडिलांना कोरोनाची लागण झाली. लोक नायक रुग्णालयात बहिणेनं अखेरचा श्वास घेतल्यानंतर तिचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आलं. मला दोन दिवसांनंतर बहिणीचा मृतदेह नेण्यास बोलावलं होतं. मात्र आई बाबांना कोरोनाची लागण झाल्यानं आणि मी आणि भाऊ आयसोलेशनमध्ये असल्यानं मला रुग्णालयात जाता आलं नाही. ७ मे रोजी मी रुग्णालयात पोहोचलो. तिथे मी ३ तास बसून होतो. त्यानंतर मला मृतदेह गायब झाल्याचं सांगण्यात आलं. मी शवागारात जाऊन प्रत्येक मृतदेह पाहिला. मात्र मला माझ्या बहिण कुठेच दिसली नाही,' अशा शब्दांत सिद्धार्थ यांनी त्यांची व्यथा मांडली.
CoronaVirus News: माझ्या बहिणीला शेवटचं पाहायला मिळेल का हो..? १० दिवसांपासून 'गायब' झालेला मृतदेह शोधणाऱ्या भावाचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 4:05 PM