कोलकाता: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र अनेक राज्यांमधील परिस्थिती अद्यापही नियंत्रणाबाहेर आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडल्यानं रुग्णांचे हाल होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी रुग्णांना योग्यवेळी उपचार मिळत नाहीत. तर कुठे कोरोनामुळे रुग्णालयात अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. या सगळ्याचा खूप मोठा मानसिक आघात देशातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सहन करत आहेत.रस्त्यावर रुग्णवाहिका हलताना दिसली; पोलिसांना बोलावताच लज्जास्पद प्रकार समोरकोरोनाच्या काळात अनेक डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यादेखत रुग्णांना प्राण सोडताना पाहिलं आहे. एक एक जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू असताना रुग्णांचे मृत्यू होत असल्यानं डॉक्टरांना मानसिक यातनांचा सामना करावा लागत आहे. पश्चिम बंगालमधील एका डॉक्टरच्या व्हिडीओमुळे त्यांची व्यथा समोर आली आहे. कोरोनाबद्दल जनजागृती करण्यासाठी डॉक्टर फेसबुक लाईव्ह करत होते. कोरोनाचा मुकाबला कसा करायचा या संदर्भात ते मार्गदर्शन करत होते. कोरोनावर ग्लुकोजसारखे औषध; किंमतही आवाक्यातच असणार, उपचारासाठीची 'संजीवनी' कितीला मिळणार?कोरोनाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी लाईव्ह करताना डॉक्टर अनिर्बन विश्वास यांचा अश्रूंचा बांध फुटला. 'डोळ्यासमोर रुग्णांना प्राण सोडताना पाहत आहोत. पण आम्हाला काहीच करता येत नाही. रुग्णांना डोळ्यादेखत जीव सोडताना पाहणं अतिशय दु:खद आणि दुर्दैवी आहे. गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली. मात्र ती इतकी धोकादायक नव्हती. मात्र कोरोनाची दुसरी लाट जास्त जीवघेणी आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमुळे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत,' अशा शब्दांत विश्वास यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
CoronaVirus News: डोळ्यांदेखत रुग्ण जीव सोडताहेत अन् आम्ही हतबलपणे पाहतोय; डॉक्टरांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 1:41 PM