नवी दिल्ली : कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे स्थगित केलेली देशांतर्गत विमानसेवा दोन महिन्यांनंतर येत्या सोमवारी, २५ मेपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी ही घोषणा केली. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरू होणार याबद्दल त्यांनी कोणतेही संकेत दिलेले नाहीत.देशात १ जूनपासून रोज २०० बिगरवातानुकूलित रेल्वेगाड्या धावणार असे रेल्वेमंत्री पीयूषगोयल यांनी मंगळवारी जाहीरकेले. त्यानंतर आता देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याची घोषणा झाली आहे.कोरोना साथीपायी लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात रेल्वे, विमान तसेच सार्वजनिक, खासगी वाहनसेवा स्थगित करण्यात आली. लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या लाखो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यांत घेऊन जाण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सोडल्या. आता विमानसेवा सुरू होत आहे. आगामी काळात कोरोना साथीसोबतच सर्वांना जगावे लागेल, हे लक्षात घेऊन केंद्र सरकार आता एक एक सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करत आहे.आॅनलाइन बुकिंग कधी?देशातील विमान कंपन्यांनी तिकिटांची सुरू केलेली आॅनलाईन आरक्षण प्रक्रिया थांबविण्याचे आदेश पुरी यांनी गेल्या महिन्यात दिले होते.विमानसेवा सुरू झाल्यानंतरच तिकीट आरक्षण सुरू करा, असेही ते म्हणाले होते. देशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे.त्यामुळे आता विमान तिकिटांचे आरक्षण कधीपासून सुरू होते, याकडे अनेकांचे डोळे लागले आहेत.सर्व विमानतळांनी सज्ज राहावेदेशाने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश केला असून, त्याचा कालावधी ३१ मेपर्यंत आहे. २५ मार्च रोजी स्थगित केलेली देशांतर्गत विमानसेवा दोन महिन्यांनी पुन्हा सुरू करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेईपर्यंत विमानाने होणारी मालवाहतूक व विदेशांत अडकलेल्यांना विमानांनी मायदेशात आणणे या सेवा सुरू होत्या. विमानसेवेसाठी आता सर्व विमानतळांनी सज्ज राहावे, असे आदेश केंद्राने दिले.
CoronaVirus News : देशांतर्गत विमानसेवेची सोमवारपासून भरारी, केंद्राची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 6:16 AM