शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

CoronaVirus News : चित्रीकरण बंद असल्याने ‘ड्रीम गर्ल’च्या अभिनेत्यावर आली फळे विकण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:42 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : हिंदी चित्रपटसृष्टींचे खरे माहेरघर म्हणजे मुंबई. रुपेरी पडद्यावर चमकण्यासाठी झपाटलेली अनेक माणसे देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील चित्रपटसृष्टीकडे धाव घेत असतात.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे चित्रीकरणही बंद असल्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ‘ड्रीम गर्ल’, ‘तितली’सारख्या हिंदी चित्रपटांत छोट्या-छोट्या भूमिकांमध्ये चमकलेल्या दिवाकर सोळंकी या कलाकारावर लॉकडाऊनमुळे पोट भरण्यासाठी आता दिल्लीच्या रस्त्यावर फळे विकण्याची वेळ आली आहे.हिंदी चित्रपटसृष्टींचे खरे माहेरघर म्हणजे मुंबई. रुपेरी पडद्यावर चमकण्यासाठी झपाटलेली अनेक माणसे देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील चित्रपटसृष्टीकडे धाव घेत असतात. असेच स्वप्न उराशी बाळगून दिवाकर सोळंकीदेखील मुंबईला गेले होते. हिंदी चित्रपटांतून छोट्या-छोट्या भूमिका करत एक दिवस मोठी झेप घ्यायची असे त्यांनी मनाशीठरविले होते.कोरोनाचे संकट भारतात आल्यानंतर, त्या साथीचा फार फैलाव होऊ नये म्हणून केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे चित्रपटांचे चित्रीकरण बंद पडले. ते लवकर सुरू होण्याचीही चिन्हे दिसेनात. हिंदी चित्रपटांत छोट्या-मोठ्या भूमिका करून गुजराण करणाºया अनेक कलाकारांची त्यामुळे पंचाईत झाली. त्यातलेच एक कलाकार असलेल्या दिवाकर सोळंकी यांचे लग्न झालेले असून त्यांना पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.आपल्या कुटुंबांचे पोट भरण्यासाठी काही तरी करणे त्यांना भाग होते. त्यामुळे दिवाकर सोळंकी लॉकडाऊनच्या काळात दिल्लीत परतले व त्यांनी रस्त्यावर फळविक्रीचा व्यवसायसुरू केला.त्यांनी सांगितले की, कोणतेही काम कमी दजार्चे नसते. फळविक्रीच्या व्यवसायातून माज्या कुटुंबाची गुजराण होत आहे. सध्या होत असलेली कमाई आम्हाला पुरेशी आहे.पुन्हा चित्रपटांत जाणार- दिवाकर सोळंकी हे काही कायमचे दिल्लीत राहायला आलेले नाहीत. लॉकडाऊन मागे घेण्यात आल्यानंतर सर्व गोष्टी सुरळीत होतील. चित्रपटांचे चित्रीकरणही पुन्हा सुरू होईल अशी त्यांना आशा आहे. तसे झाल्यास ते मुंबईला पुन्हा चित्रपटांच्या जगात परत जातील. लॉकडाऊन नसता तर काही चित्रपटांत आणखी छोट्या-मोठ्या भूमिका करताना मी तुम्हाला दिसलो असतो, असे सोळंकी आवर्जून सांगतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDream Girl Movie 2019ड्रिम गर्ल