नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,73,69,093 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,11,298 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,847 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,15,235 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. कोरोना वॉरिअर्सचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक पत्रकारांचा देखील मृत्यू झाला आहे. याच दरम्यान केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी 5 लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार भारत सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या 67 कुटुंबाना आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली आहे. गुरूवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक परिवारास 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी केली जात होती.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी देखील अशा कुटुंबासाठी सहायता निधीची मागणी केली आहे. केंद्र सरकारने देखील हा मुद्दा गांभीर्याने घेत गुरूवारी एका बैठकीत आर्थिक मदतीसाठी मंजुरी दिली. केंद्र सरकार 67 पत्रकारांच्या कुटुंबास 5 लाख रुपये आर्थिक मदत देणार आहे. "जगात कोरोनापेक्षाही अधिक घातक व्हायरस येऊ शकतो" असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी याबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सभासद असलेल्या 194 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते.
धोका वाढला! "जगात कोरोनापेक्षाही अधिक घातक व्हायरस येऊ शकतो"; WHO प्रमुखांचा गंभीर इशारा
जगभरात अद्याप ही भयंकर स्थिती निर्माण झालेली आहे. वेगाने कोरोनाची लसीकरण केल्यानंतरही आजाराचा धोका संपणार नाही अशा गंभीर इशारा देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली आहे, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आणि त्याच्या नवनवीन व्हेरिएंटचा प्रसार होत आहे अशा वेळी कोणतीही खबरदारींबाबत शिथिलता बाळगणे चुकीचे ठरू शकते. संपूर्ण जग अखेरच्या महासाथीच्या आजाराचा सामना करत नाही. तर कोरोनाच्या तुलनेत आणखी घातक आणि संसर्गजन्य असलेल्या व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. टेड्रोस यांनी कोरोना लसीचा साठा करणाऱ्या देशांनाही यावेळी सुनावले. त्यांनी म्हटले की, लशीच्या वितरणात जगभरात अपमानास्पद असमानता निर्माण झाली आहे. जगातील एकूण 75 टक्के कोरोना लस फक्त 10 देशांमध्ये देण्यात आली आहे.