बंगळूरू : एखाद्या संशयिताला किंवा आरोपीला अटक केल्यानंतर त्याला लगेचच आंघोळ करायला लावा, असा आदेश बंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी पोलिसांना दिला आहे. बंगळुरू पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.बंगळुरू पोलीस दलात १६ हजार जण असून, गेल्या काही आठवड्यांत ३८ पोलिसांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. गेल्या चार दिवसांत दोन पोलिसांचा या आजाराने मृत्यू झाला असून, अन्य ३५० पोलीस कर्मचारी क्वारंटाइनमध्ये आहेत. या संसर्गाचा पोलीस दलात आणखी फैैलाव होऊ नये म्हणून बंगळुरू पोलीस आयुक्तांनी आपल्या सहकाऱ्यांना काही आदेश दिले आहेत.त्यांनी म्हटले आहे की, संशयिताला किंवा अट्टल गुन्हेगाराला अटक केल्यानंतर त्याला सर्वप्रथम आंघोळ करायला लावा. हे सर्वच प्रकरणांमध्ये शक्य होईल असे नाही. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा या सूचनेचे पोलिसांनी पालन करावे. जर एखाद्या आरोपीला घरात अटक केली, तर त्याला तिथे आंघोळ करायला सांगा किंवा या आरोपीला घेऊन जवळच्या सार्वजनिक प्रसाधनगृहात जावे. आंघोळीनंतर त्याने कपडे बदलले आहेत की नाही याचीही खात्री करून घ्यावी.या आरोपीचे व्यवस्थित सॅनिटायझेशन झाल्यानंतरच त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जावे. आरोपीची तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी. चाचणीचा अहवाल येत नाही तोवर या आरोपीशी फिजिकल डिस्टन्सिंग राखावे. आरोपीच्या निकट संपर्कात येणाºया पोलिसांनीही स्वत:चे सॅनिटायझेशन करून घ्यावे.>आरोग्य सुरक्षेसाठी घ्या दक्षताबंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी म्हटले आहे की, कोरोना साथीमुळे सध्या अतिशय बिकट स्थिती निर्माण झाली असून त्यातही आपल्याला नीट काम करायचे आहे. त्यासाठी आरोग्य सुरक्षेकरिता पुरेपूर दक्षता बाळगायची आहे. छोटे-मोठे गुन्हे करणारे अनेक आरोपी हे कोरोना संसर्गाने ग्रस्त आहेत. त्यांच्यामुळे पोलिसांना या आजाराची लागण होते. तो संसर्ग रोखायला हवा. पदरायनपुरा भागात हिंसाचार केल्याच्या आरोपाखाली अटक केलेले चार गुन्हेगार कोरोनाग्रस्त होते. त्यामुळे सुमारे ४० पोलिसांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्याची वेळ आली होती. अशी आणखी काही उदाहरणे बंगळुरू शहरात घडली आहेत.
CoronaVirus News : आरोपीला अटक केल्यानंतर लगेचच त्याला आंघोळ करायला लावा..!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 2:45 AM