नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार आणि गुजरात मॉडेलवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संसर्गामुळे होणारा मृत्यूदर हा गुजरात राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे इतर राज्यांशी तुलना करत ‘गुजरात मॉडल’ फेल गेल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गुजरात राज्यातील तुलना काँग्रेस शासित राज्यांशी करत राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यूदर गुजरातमध्ये 6.25, महाराष्ट्र 3.73%, राजस्थान 2.32%, पंजाब 2.17%, पुडुचेरी 1.98%, झारखंड 0.5% आणि छत्तीसगढ 0.35% इतका आहे''. त्यामुळे या आकडेवारीकडे पाहता कोरोना संकटापुढे 'गुजरात मॉडेल' अयशस्वी झाल्याचे दिसून येते.
कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यावरून काल सुद्धा राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. यावेळी राहुल गांधी यांनी ट्विटरवर कोरोना संसर्गामुळे होणारे मृत्यू आणि अर्थव्यवस्थेचा ग्राफ शेअर केला आहे. याचबरोबर, "अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", हे या लॉकडाऊनने दाखवून दिल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. तसेच, "अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार" हे वाक्य महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाइन यांचे आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, गुजरातच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कोरोनाची लागण झालेले 514 नवे रुग्ण आढळले आहेत. गुजरातमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 24,104 वर पोहोचली आहे.
आणखी बातम्या...
तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत
मानसिक रुग्णांना विमा का मिळत नाही?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल
पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार
"अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा