कोरोनाची दुसरी लाट आता ओसरायला लागली आहे. देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट होऊ लागली आहे. तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच कोरोना चाचणी करून घेण्यासाठी आणखी एका चाचणी संचाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंजुरी दिली आहे.कोणाला दिली मंजुरी‘आयसीएमआर’ने शिकागोस्थित ॲबॉट रॅपिड डायग्नाॅस्टिकक्स डिव्हिजन यांनी विकसित केलेल्या अँटिजन टेस्ट किटला मंजुरी दिली आहे.५ जुलैनंतर या किटची किंमत निश्चित होणार आहे.कसे आहे हे टेस्ट किट?कोरोनाची लक्षणे वाटत असलेल्या लोकांसाठी हे किट आहे.गुगल प्लेस्टोअर आणि ॲपलवर टेस्ट किटचे सेल्युलर ॲप उपलब्ध असेल, ते डाऊनलोड करावे.अँटिजन टेस्ट कशी करायची याची संपूर्ण माहिती सेल्युरलर ॲपवर दिली असेल.टेस्ट किटमध्ये एक स्ट्रिप दिली असेल. या स्ट्रिपच्या साह्याने अँटिजन टेस्ट करता येईल.स्ट्रिपचा फोटो सेल्युलर ॲपवर अपलोड करायचा.पॉझिटिव्ह आढळल्यास?रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधितांनी तातडीने आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी.आरटी-पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित कोरोनाबाधिताने त्याची माहिती आरोग्य केंद्राला द्यावी.तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.लक्षणे मध्यम वा तीव्र स्वरूपाची असतील तर रुग्णालयात भरती व्हावे.सौम्य असल्यास गृह विलगीकरणात रहावे.जमा झालेला डेटा कंपनी आणि आरोग्य मंत्रालयाच्या सर्व्हरवर सेव्ह केला जाईल.
CoronaVirus News: घरच्या घरी करा अँटिजन टेस्ट; आणखी एका टेस्ट किटला ‘आयसीएमआर’ची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 7:44 AM