शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus News: सवलतींसह वाढला लॉकडाऊन, १७ मे आता नवीन तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 6:22 AM

फिजिकल डिस्टन्सिंग, चेह-यावर मास्क असणे मात्र देशभरात बंधनकारक असेल. मुंबई, पुणे व दिल्ली रेड झोनमध्ये असल्याने तेथील नागरिकांना कोणताही दिलासा मिळणार नाही.

नवी दिल्ली : देशभर लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यात ४ ते १७ मे दरम्यान लॉकडाऊन कायम असेल. मात्र रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये विभागणी करून जनजीवन सुरळीत करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शिका प्रसिद्ध करत रहिवाशांना सूट दिली आहे. ग्रीन झोनमधील प्रमुख आर्थिक व्यवहारांना परवानगी देताना रेड झोनमध्ये मात्र निर्बंध वाढवले आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग, चेह-यावर मास्क असणे मात्र देशभरात बंधनकारक असेल. मुंबई, पुणे व दिल्ली रेड झोनमध्ये असल्याने तेथील नागरिकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. रुग्णसंख्या कमी होत जाण्यासाठी तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली. २१ एप्रिलला जारी केलेल्या मार्गदर्शिकेमुळे अनेक दुकाने उघडली होती. ग्रामीण भागातील व्यवहार पूर्वपदावर येत होते.>ग्रीन झोन : याआधीच रहिवासी व व्यापारी संकुलातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. आता अशा जिल्ह्यांमध्ये शहरांतर्गत बस धावू शकेल. मात्र त्यात आसनक्षमतेच्या ५०% प्रवासी त्यातून प्रवास करू शकतील. खासगी वाहनातून आंतरजिल्हा प्रवासासाठी केवळ वैद्यकीय व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक. दुकाने उघडण्यासही मुभा. खासगी कॅबला परवानगी. मद्यविक्रीस परवानगी.>आॅरेंज झोन : या विभागात जिल्ह्यातील कंटेनमेंट क्षेत्रास कोणतीही सूट नसेल. उर्वरित भागात ओला, उबेरसह खासगी टॅक्सी वाहतुकीस परवानगी. मात्र चालकासह २ जणांना प्रवास करता येईल. खासगी चारचाकीसाठीही हा नियम कायम असेल. औद्योगिक वसाहतीत नियम पाळून काम सुरू करता येईल.>रेड झोन : जीवनावश्यक वस्तू व औषध वाहतुकीला परवानगी. सायकल रिक्षा, आॅटो रिक्षा, खासगी टॅक्सीसह ओला, उबरला परवानगी नाही. खासगी वाहनातून चालकासह दोघांना परवानगी. दुचाकीवर एकच जण. विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग, वैद्यकीय उपकरणे, औषध निर्माण व ई-कॉमर्सवरून जीवनावश्यक वस्तू तसेच खासगी कार्यालयांत ३३ टक्के कर्मचाºयांना परवानगी.>नागरिकांची जबाबदारी : सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयांत फेस मास्क बंधनकारक. पाचपेक्षा जास्त जणांना एकत्र येता येणार नाही. अंंत्ययात्रेत २० जणांना सहभागी होता येईल. कामाच्या ठिकाणी परस्परांपासून अंतर राखणे आवश्यक.>देशातील जिल्ह्यांची विभागणी130रेड झोन284आॅरेंज झोन319ग्रीन झोन>हे बंदच : विमान, रेल्वे, आंतरराज्य बस, मेट्रो, आंतरराज्य प्रवास, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, हॉटेल्स, रेस्तराँ, क्रीडा संकुल, धार्मिक ठिकाणे, प्रार्थनास्थळे. सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत घराबाहेर पडण्यावर निर्बंध. रेड व आॅरेंज झोनमधील परिसरात जमावबंदी कायद्याचे पालन. केश कर्तनालय.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या