नवी दिल्ली : देशात शनिवारी कोरोनाचे १ लाख ७३ हजार ७९० नवे रुग्ण आढळून आले. गेल्या ४५ दिवसांतील हा नीचांक आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून शनिवारी २ लाख ८४ हजार ६०१ जण या संसर्गातून बरे झाले व ३६१८ जणांचा बळी गेला.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७ इतकी असून त्यातील २ कोटी ५१ लाख ७८ हजार ११ जण बरे झाले. देशात सध्या २२ लाख २८ हजार ७२४ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत व बळींची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ५१२ इतकी झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९०.८० टक्के आहे. जगभरात १७ कोटी १ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १५ कोटी २० लाख रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ३५ लाख ३८ हजार जणांचा बळी गेला आहे. जगात १ कोटी ४४ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेमध्ये ३ कोटी ४० लाख रुग्ण आहेत. त्यातील २ कोटी ७७ लाख जण बरे झाले आहेत तर ५६ लाख ४६ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या देशात कोरोनामुळे ६ लाख ८ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये १ कोटी ६३ लाख कोरोना रुग्ण आहेत व ४ लाख ५९ हजार लोकांचा बळी गेला. ही संख्या भारतातील बळींपेक्षा अधिक आहे.युरोपमध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठी घटयुरोपममध्ये उन्हाळ्याच्या मोसमामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. या खंडातील देशांमध्ये लसीकरणाने वेग घेतला असून त्यामुळेही परिणाम साधता आल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. जगातील इतर खंडांच्या तुलनेत युरोपमध्ये या आठवड्यात नवे कोरोना रुग्ण व मरण पावलेल्याची संख्या कमी होती.
CoronaVirus News: नव्या रुग्णांचा ४५ दिवसांतील नीचांक; कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 6:06 AM