नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत ब्राझिलला मागे टाकून भारत दुसºया स्थानावर पोहोचला. देशात सोमवारी ९०,८०२ नवे रुग्ण आढळून आले असून हा आजवरचा उच्चांक आहे. रुग्णांची एकूण संख्या आता ४२ लाखांवर गेली असून, बरे होणाऱ्यांचा आकडा ३२ लाखांवर पोहोचला. अमेरिकेमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची संख्या ६४ लाख ६० हजारांहून अधिक आहे. ब्राझिलमध्ये या आजाराचे ४१ लाख ३७ हजार रुग्ण आहेत. तर भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता ४२,०४,६१३ झाली आहे.
कोरोनाची चाचणी १९०० ऐवजी १२०० रुपयांत
राज्यातील एनएबीएल आणि आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या तपासणीचे कमाल सुधारित दर सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी निश्चित केले. त्यानुसार आता या चाचणीसाठी १९०० रुपयांऐवजी १२०० रुपये मोजावे लागतील. ७०० रुपये कमी करण्यात आले आहेत. १२०० रुपयांपेक्षा अधिक दर कोणत्याही प्रयोगशाळेला आकारता येणार नाहीत.