नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाल्याचे समोर दिसून आले आहे.
देशात गेल्या 24 तासांत 12 हजार 881 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 66 हजार 946 वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 12 हजार 237 झाला आहे.
याचबरोबर, गेल्या 24 तासांत 7 हजार 390 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 1 लाख 94 हजार 325 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरीचा रेट 52.95 टक्के इतका आहे. तर सध्या 1 लाख 60 हजार 384 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 83 लाखांवर गेली आहे. तर तब्बल चार लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रतही कोरोनाबाधितांचा आकडा सतत वाढत आहे. काल दिवसभरात 3307 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 16 हजार 752 इतकी झाली आहे. बुधवारी राज्यात एका दिवसांत 114 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात आतापर्यंत 5651 जण दगावले आहेत.
आणखी बातम्या...
भारताची चीनला घेरण्याची तयारी, सीमेवर जवान सतर्क, रस्ता बांधणीला वेग
कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"
India China FaceOff : भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला सुनावले, म्हणाले...
India Chine Faceoff : जवानांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही - राजनाथ सिंह
दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव