नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे लागू केलेला देशव्यापी लॉकडाऊन मागे घेण्याच्या दुसऱ्या टप्प्यातही आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानसेवा १५ जुलैैपर्यंत बंदच राहणार आहे. डायरेक्टरेट जनरल आॅफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए) आंतरराष्ट्रीय विमानसेवा सध्या तरी बंदच राहतील, असा निर्णय शुक्रवारी घेतला.या निर्णयानुसार भारतातून विदेशात अथवा विदेशातून भारतात काही अपवाद वगळता विमान वाहतूक बंदच ठेवण्यात येणार आहे. याविषयीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.असे असले तरी काही ठरावीक मार्गांवर आंतरराष्टÑीय उड्डाणे सुरू केली जाण्याची शक्यता आहे, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी भारतात मार्चच्या दुसºया आठवड्यात आंतरराष्टÑीय विमानसेवा बंद करण्यात आली होतीे. दोन महिन्यांच्या खंडानंतर २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली होती. याद्वारे तब्बल २० लाख नागरिकांनी विमानसेवेचा लाभ घेतल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. कोरोनामुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना सध्या ‘वंदे भारत मिशन’च्या तिसºया टप्प्याअंतर्गत मायदेशात विशेष विमानाने परत आणले जात आहे. २२ मार्चला देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यावर विमान प्रवासावरही निर्बंध आले होते. नागरी उड्डयण मंत्रालयाने विश्वास व्यक्त केला आहे की वर्षाअखेरपर्यंत देशांतर्गत विमानसेवा पूर्णपणे सुरू झालेली असेल.
CoronaVirus News: आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंदच राहणार, डीजीसीएने घेतला महत्त्वाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 4:21 AM