नवी दिल्लीः देशात कोरोना विषाणूसारख्या साथीच्या रोगानं हाहाकार माजवला असतानाच एक चांगली बातमीही समोर आली आहे. जामियामध्ये शिकणार्या एका विद्यार्थ्याला 41 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. जामियामध्ये सध्या प्लेसमेंट्स सुरू असून, कोरोना लॉकडाऊन होण्यापूर्वीच सुरू झाले होते. सध्या ते ऑनलाइन सुरू आहे. प्रथम बत्रा या नावाच्या विद्यार्थ्याला वर्षाकाठी 41 लाख रुपयांच्या ऑफरचं पॅकेज मिळालं आहे.प्रथम बत्रा जामिया येथून बीटेक करत होता. मायक्रोसॉफ्ट इंडियाने त्याला ही ऑफर दिली आहे. प्रथम बत्रा हा गाझियाबादमधील नेहरू नगर येथे राहतो. जामियाच्या अभियांत्रिकी विभागाच्या अभ्यासक्रमातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज आहे. बत्राने 12वीच्या वर्गात 90.4 टक्के गुण मिळवले होते.257 जणांना आतापर्यंत नोकरीच्या ऑफर आल्या जामिया युनिव्हर्सिटी प्लेसमेंट सेलने कोरोनाच्या आधी शेवटच्या सत्रात प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात सुरुवात केली होती, ज्यामध्ये 52 कंपन्यांनी विविध पदव्युत्तर, पदवीधर आणि पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना 257 नोकरीच्या संधी दिल्या आहेत. बीटेकच्या प्रथम बत्रा नावाच्या विद्यार्थ्याला मायक्रोसोफ्ट इंडियाने 41 लाख रुपये वार्षिक वेतनाची प्री-प्लेसमेंटची ऑफर दिली आहे आणि बीटेकची विद्यार्थी आभा अग्रवाल याला दरमहा 80000 रुपये वेतन असणारी इंटर्नशिप देण्यात आली आहे. सध्या जामिया मिलिया इस्लामियाचे कुलगुरू प्रा. नझ्मा अख्तरने त्यांच्या प्लेसमेंट सेलला ऑनलाइन प्लेसमेंट ड्राईव्हसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. ऑनलाइन शिक्षणाद्वारे विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना तयार केले आहे. असे केल्याने जामिया देशातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये सामील झाली आहे.कोणत्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळू शकतेजामियाचे जनसंपर्क अधिकारी अहमद अजीम म्हणाले, 'जामियाच्या विद्यार्थ्यांना नोकरी देणा-या कंपन्यांमध्ये सॅमसंग आर अँड डी, सिमेंस, महिंद्रा कॉमविवा, वेदांता लिमिटेड, एनआयआयटी, एल अँड टी लिमिटेड, अमेरिकन एक्सप्रेस, विप्रो टेक्नोलॉजीज, आयबीएम, एल अँड टी कन्स्ट्रक्शन, इनोव्हेटर, टीएफटी, स्प्रिंगबोर्ड, न्यूजेन टेक्नॉलॉजीज, जिया सेमीकंडक्टर, टीसीएस, ओवायओ, एव्हीझेडव्हीए, फुजीत्सु सल्ला एनजी, जेल कन्सल्टिंग, अझीम प्रेमजी फाऊंडेशन, सेरिट, टीव्ही 9, सियानाइफ ग्रुप, ऑप्टॉम युनायटेड हेल्थ ग्रुप इत्यादी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळू शकतात.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News: तैवाननं WHAच्या बैठकीत भाग घेण्यासाठी भारताकडे मागितली मदत, चीन भडकला
CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी कोरा कागद दिला, आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवू- पी. चिदंबरम
Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी
Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक