नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत पाचव्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा एक रोडमॅप देशासमोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
सध्या देशभरात कोरोना महामारी पसरली आहे. अशा परिस्थित केंद्राने राजकारण करू नये. आम्ही एक राज्य म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी चांगले काम करत आहोत. अशा महत्वाच्या वेळी केंद्राने राजकारण बाजूला ठेवावे. आम्ही आंतरराष्ट्रीय सीमा आणि इतर मोठ्या राज्यांना जोडलेले आहोत, म्हणून काही त्रास देखील आम्हाला सहन करावा लागत आहे. केंद्राने कोणताही भेदभाव न करता, एकजुटीने काम करावे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
देशातील लॉकडाउनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे तमिळनाडुचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनी 31 मेपर्यंत ट्रेन आणि विमान सेवा सुरू न करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या बैठकीच्या सुरुवातीला गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी आरोग्य सेतू अॅपच्या वापरावर भर दिला. नागरिकांनी हे अॅप डाउनलोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावे, असे अमित शाह यांनी सांगितले.
आणखी बातम्या -
विमान सेवा सुरू होणार? एजन्सींच्या पथकाची दिल्ली विमानतळाला भेट!
आजपासून पॅसेंजर ट्रेनसाठी बुकिंग सुरू; पण, यासाठी काय करावं लागेल?
प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी; 'या' गोष्टी करणं बंधनकारक!