शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शेवटी आईच ती! ६ महिन्यांपूर्वी निधन झालेल्या मुलाला आई व्हिडीओ कॉल करते अन् लेक बोलतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 3:15 PM

mother makes video call to son which she lost 6 months ago due to corona: मुलानं अखेरचा श्वास घेतलेल्या रुग्णालयाजवळ जाऊन त्याला व्हिडीओ कॉल करते आई

अहमदाबाद: कोरोनाचा कहर वर्षभरापासून सुरू आहे. या वर्षभरात अनेकांनी त्यांचे जवळचे नातेवाईक गमावले. आपली जवळची व्यक्ती शेवटचा श्वास घेत असताना आपण तिच्या जवळदेखील राहू न शकणं, अनेकदा तिला शेवटचं नीट पाहू न शकणं अशी स्थिती कोरोनामुळे माणसांवर आली. अनेकांची घरं, स्वप्नं कोरोना संकटानं अक्षरश: उद्ध्वस्त केली. गुजरातच्या अहमदाबादमधल्या पूनम सोळंकी यांचा मुलगा कोरोनानं हिरावला. मात्र पूनम आजही लेकाला फोन करतात, त्यांचा लेक त्यांच्याशी बोलतो. पूनम यांची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे.अहमदाबादमध्ये राहणाऱ्या पूनम सोळंकी यांच्या मुलाचं निधन होऊन ६ महिने होऊन गेलेत. गेल्या वर्षी सिव्हिल रुग्णालयात त्यानं अखेरचा श्वास घेतला. लेकाच्या मृत्यूचा पूनम यांना धक्का बसला. त्या आजही रुग्णालयाबाहेर जातात. मुलगा महेंद्रला फोन करतात. २४ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचा मुलगा हे जग सोडून गेला आहे. पण आजही महेंद्र आईशी बोलतो आणि हे पाहून अनेकांचे डोळे पाणवतात.उपचारांविना मुलाचा मृत्यू, ई-रिक्षामधून मृतदेह नेण्याची आईवर आली वेळ महेंद्रनं सिव्हिल रुग्णालयात प्राण सोडला. तो रुग्णालयात असताना पूनम यांचा त्याच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद झाला. तेव्हाचा व्हिडीओ कॉल पूनम यांनी रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ कॉल लाडक्या लेकासोबतचा शेवटचा संवाद ठरेल, याची कल्पनादेखील त्यांनी केली नव्हती. मात्र हीच त्यांची लेकासोबतची शेवटची आठवण आहे. गेल्या ६ महिन्यांपासून पूनम सिव्हिल रुग्णालयाबाहेर येतात. महेंद्रसोबतचा तो व्हिडीओ कॉल प्ले करतात. आपला लेक आपल्याशी बोलतो याचं त्यांना समाधान वाटतं.धक्कादायक! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १२ कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यूआपला लेक रुग्णालयातच काय, या जगातच नाही याची कल्पना पूनम यांना असल्याचं त्यांचं नातेवाईक सांगतात. पण शेवटी आईचं हृदय ते. तिला कोण आणि कसं समजावणार?, रुग्णालयाच्या जवळ जाऊन लेकासोबतचा व्हिडीओ कॉल पाहून पूनम यांना काही वेळासाठी का होईना बरं वाटतं, अशा शब्दांत नातेवाईक हतबलता व्यक्त करतात. 'आपला मुलगा या जगात नाही याची पूनम यांना जाणीव आहे. पण ही गोष्ट फार दिवस त्या स्वत:ला समजवू शकत नाहीत. महेंद्रची आठवण आल्यावर पूनम रुग्णालयाजवळ जातात. तो व्हिडीओ कॉल पाहून पूनम यांना समाधान वाटतं. हा सगळा भ्रम आहे हे आम्ही जाणतो. पण पूनम यांना काही वेळासाठी दु:खातून बाहेर काढण्याचा दुसरा कोणताही मार्ग आमच्याकडे नाही', अशी भावना नातेवाईकांनी बोलून दाखवली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या