नवी दिल्ली : देशातील कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि.११) दुपारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्या होणारी ही बैठक ५ वी आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. या तिसऱ्या लॉकडाऊनचा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याबाबत निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. यासाठी ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते.
आणखी बातम्या...
भारत-चीन सैनिकांमध्ये संघर्ष, सीमेवर काहीकाळ तणावाची परिस्थिती
CoronaVirus : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बराक ओबामा भडकले; फोन कॉल लीक
पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाली
CoronaVirus: कोरोनावर लस तयार करण्याच्या भारत फक्त एक पाऊल दूर; प्राण्यांवर होणार ट्रायल