शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

CoronaVirus News: परदेशातून आलेल्यांची कोरोना चाचणी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:10 AM

विशेष म्हणजे त्यांना १४ दिवस क्वारंटाईनची सक्ती असतानाही हा निर्णय घेण्यात आला

- टेकचंद सोनवणेनवी दिल्ली : वंदे भारत अभियानांतर्गत परदेशात अडकून पडलेले भारतीय मायदेशी आल्यानंतर विमानतळाचा अपवाद वगळता त्यांची आरोग्य तपासणी केलीच जात नाही. अमेरिकेतून दिल्लीत १५ मे रोजी दाखल झालेल्या सर्व प्रवाशांना दहा दिवसांच्या क्वारंटाईननंतर विना तपासणीच घरी सोडण्यात आले.

विशेष म्हणजे त्यांना १४ दिवस क्वारंटाईनची सक्ती असतानाही हा निर्णय घेण्यात आला. हॉटेल लि मेरेडिअनमध्ये थांबलेल्या प्रवाशांना दहा दिवसांनी तुम्ही घरी जाऊ शकता, असे हॉटेल व्यवस्थापनानेच सांगितले. परदेशातून मायदेशी परतणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने हॉटेलमध्ये खोल्या अपुºया असल्याचे कारण त्यामागे देण्यात आले.अमेरिकेतून १२ मे रोजी मुंबईत दाखल झालेल्या एका प्राध्यापकास एअरपोर्टवरच रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत थांबावे लागले. नागपूरकर प्राध्यापक अभ्यास दौºयासाठी अमेरिकेस गेले व लॉकडाऊनमुळे अडकून पडले.

मुंबईत आल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास सोडला खरा; पण त्यांच्यासह सहा जणांना एका नॉन एसी टेम्पो ट्रॅव्हलरमधून मुंबईहून नागपूरला रस्त्याने घरी पाठवण्याची ‘व्यवस्था’ राज्य सरकारने केली होती. हा अनुभव त्यांच्यातील एकानेच ‘लोकमत’कडे कथन केला.केंद्रीय परराष्ट्र व हवाई वाहतूक मंत्रालयाने मात्र प्रवासात पुरेशी काळजी घेतल्याचेही एका प्रवाशाने सांगितले. मात्र, दिल्लीत दहा दिवसांच्या क्वारंटाईननंतर घरी सोडण्यात आलेल्यांचा अनुभव वेगळा आहे. हॉटेलमध्ये रूमबाहेर पडण्यास मनाई होती.अत्यंत काटोकोरपणे फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात होते. दिल्लीत विमानातून उतरल्यावर लगेचच आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोना चाचणी मात्र दिल्ली व मुंबईत आलेल्या कुणाचीही झाली नाही. दहा दिवसांच्या क्वारंटाईननंतर त्यांना घरातच पुढचे १० दिवस थांबण्याची सूचना आहे. स्वयंशिस्तीने ती पाळण्याची अपेक्षा या अधिकाºयाने व्यक्त केली. 

चाचणी का नाही?

लक्षणे नसलेल्यांनाच मायदेशी आणले त्यामुळे कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाºयाने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत