नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात देशामध्ये सुमारे १०६ दिवसांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाखांहून कमी झाली आहे. सध्या ४,९४,६५७ सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी आणखी ४४,२८१ नवे रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ८६ लाख ३६ हजारांवर पोहोचली. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९२.७९ टक्के झाले आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले, कोरोनामुळे आणखी ५१२ जण मरण पावले असून, बळींचा आकडा १,२७,५७१ झाला. जगामध्ये दर दहा लाख लोकांमागे ६,४३९ कोरोना रूग्ण आहेत. रुग्ण असून, त्यातील ३ कोटी ६४ लाख २८ हजार रुग्ण बरे झाले. या संसर्गाने जगभरात १२ लाख ८० हजार जणांचे बळी घेतले आहेत.
अमेरिकेत ६६ लाख जण कोरोनामुक्त
अमेरिकेमध्ये १ कोटी पाच लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ६६ लाख रुग्ण बरे झाले आहेत. युरोपमध्ये सर्वाधिक रुग्ण फ्रान्समध्ये आहेत. त्यानंतर स्पेन, इंग्लंड, इटली, जर्मनी आदी देशांचा क्रमांक लागतो.