नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव देशात कायम असून अद्यापही धोका टळलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता कोरोनाची लाट ओसरत असल्याचं दिसून येत होतं. मात्र आरोग्य मंत्रालयानं देशातल्या जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. याआधी आरोग्य क्षेत्राशी संबंधित संघटना, जागतिक तज्ज्ञांनीदेखील धोका कायम असल्याचा इशारा दिला होता.देशातील मोठी लोकसंख्या अजूनही कोरोनाच्या विळख्यात असल्याचं आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं. यासाठी आरोग्य मंत्रालयानं सीरो सर्व्हेचा आधार घेतला. कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्यानं सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचं, वारंवार हात धुण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आलं.
CoronaVirus News: चिंताजनक! लक्षणीय लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात; आरोग्य मंत्रालयानं सांगितला धोका
By कुणाल गवाणकर | Published: September 29, 2020 8:37 PM