नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. देशाला संबोधित करताना मोदींनी लॉकडाऊन सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र हा लॉकडाऊन आधीपेक्षा खूप वेगळा असेल, असे संकेतदेखील त्यांनी दिले. नव्या लॉकडाऊनचे नियम नवे असणार आहेत. यामध्ये राज्यांना अधिकचे अधिकार असतील.१७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. त्यानंतर देशात काय होईल याचे संकेत मोदींनी काल दिले. १८ मेच्या आधी राज्य सरकारं लॉकडाऊनबद्दलची माहिती देतील, असं मोदींनी सांगितलं. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्यांना जास्त अधिकार असणार हे स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान मोदींनी सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सहा तास चाललेल्या बैठकीत मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या शिफारशी ऐकून घेतल्या. १५ मेपर्यंत आराखडे सादर करण्याची सूचना मोदींनी केली.लॉकडाऊनचा चौथा टप्पा नव्या रंगरुपातला असेल. नव्या नियमांचा असेल, असं मोदी काल देशाला संबोधित करताना म्हणाले. आपण नियमांचं पालन करून कोरोनाचा सामना करू आणि पुढे जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कोणते बदल पाहायला मिळू शकतात?- लॉकडाऊन केवळ रेड झोन आणि हॉटस्पॉटमध्ये कठोर असू शकेल.- ग्रीन झोनमध्ये अधिक सूट दिली जाऊ शकते.- आर्थिक व्यवहार कितपत सुरू करायचे त्याचा निर्णय राज्य सरकारं घेऊ शकतात.- झोन निश्चित करण्याचा अधिकारदेखील राज्य सरकारांना मिळू शकतो.- काही राज्यं दिवसा कर्फ्यू हटवत असून संध्याकाळी सातनंतर तो अधिक कठोर करत आहेत. तसा नियम लागू होऊ शकतो.- कार्यालयं सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात.- सध्या ज्या प्रकारे रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे, त्याच प्रकारे विमान सेवा सुरू केली जाऊ शकते.
…म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक२० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक