आग्रा: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज कोरोनाच्या ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील आरोग्य व्यवस्था व्हेटिंलेटरवर आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशच्या आग्र्यात घडलेल्या घटनेनं पोलीस प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पोलिसांच्या मनमानीपणामुळे एका महिलेचा जीव गेला आहे.एका किडनीच्या भरवशावर कोरोनाला दिली मात; ८२ वर्षीय पुष्पाताईसुद्धा झाल्या बऱ्याआग्र्यातील एका रुग्णालयात १७ वर्षांच्या तरुणाची आई उपचार घेत होती. तिच्यासाठी तरुणानं कसाबसा ऑक्सिजन सिलिंडर मिळवला. मात्र पोलिसांनी त्याच्याकडून सिलिंडर हिसकावून घेतला. तरुण पोलिसांसमोर गुडघ्यावर बसून, हात जोडून ऑक्सिजन सिलिंडर परत द्या अशी विनंती करत होता. मात्र पोलिसांनी जराही दया आली नाही. 'सिलिंडर नेऊ नका. माझी आई मरेल. मी तिच्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था कुठून करा?', अशी आर्त साद घालत तरुण आक्रोश करत होता.
आग्र्यातील रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर आणि वर्तणुकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अतिरिक्त पोलीस संचालक राजीव कृष्णा यांनी व्हायरल व्हिडीओच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आग्र्याच्या एका रुग्णालयात काही पोलीस कर्मचारी ऑक्सिजन सिलिंडर नेण्यास आले होते. त्यांनी एका मुलाला ऑक्सिजन सिलिंडर नेताना पाहिलं. त्यांनी त्याच्याकडून सिलिंडर हिसकावून घेतला. व्हिडीओमध्ये पीपीई किट घातलेला मुलगा गुडघ्यावर बसून पोलिसांकडे सिलिंडर परत देण्याची विनंती करताना दिसत आहे.प्रचार, कुंभमेळ्याहून परतलेले ठरणार सुपरस्प्रेडर; राज्यात संक्रमण वाढण्याची शक्यतापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ आग्र्यातल्या उपाध्याय रुग्णालयातला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणाचं नाव अंश गोयल आहे. अंशला मोठ्या मुश्किलीनं आईसाठी ऑक्सिजन सिलिंडर मिळाला होता. मात्र कोण्या व्हीआयपीसाठी पोलिसांनी त्याच्याकडे असणारा सिलिंडर हिसकावून घेतला. दोन तासांनी त्याच्या आईचा मृत्यू झाला.