नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक कमी होत आहे. मात्र दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. दुसऱ्या लाटेनं टोक गाठलं असताना देशात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता जाणवू लागली. यामुळे देशात अनेकांचे प्राण गेले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षण संशोधन विकास संस्थेनं (डीआरडीओ) DRDO २ डीजी औषधाची निर्मिती केली. डॉ. रेड्डीज लॅबकडून या औषधाचं उत्पादन केलं जाणार आहे. या औषधाच्या एका पाकिटाची किंमत ९९० रुपये इतकी असेल. याबद्दलची घोषणा थोड्याच वेळापूर्वी करण्यात आली. CoronaVirus News: Price of Drdo 2dg anti Covid drug fixed at rs 990
२ डीजीचे स्वरूप... (How 2dg works on Corona)2 डीजी हे औषध 2डीजी अणूचे परिवर्तीत रुप आहे. जे ट्युमर, कॅन्सरच्या पेशींवर उपचारासाठी वापरले जाते. चाचणीमध्ये 2 डीजी कोरोना रुग्णांवर परिणामकारक असल्याचे समोर आले. तसेच हे औषध हॉस्पिटलाईज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनवरील अवलंबित्वदेखील कमी करते.
कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिअंटला रोखणार?INMAS चे संचालक डॉ. अनिल मिश्रा यांच्यानुसार 2 डीजी हे औषध आपलीच कॉपी बनविणाऱ्या व्हायरसला पकडते. व्हायरसचा कोणताही व्हेरिअंट असुदे त्याला भूक लागते. ही भूक शमविण्यासाठी तो पुढे येईल तेव्हा 2डीजी औषध त्याला जखडेल. व्हायरस वेगाने वाढू लागल्याने रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासू लागते. मात्र, हे औषध व्हायरसला वाढण्यापासून रोखत असल्याने आपोआपच रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासणार नाही.
किती डोस घ्यायचा? (2 dg medicine dose)एका पाकिटात हा डोस मिळेल. कोरोना रुग्णाला ओआरएस जसे पाण्यात मिसळतात आणि पितात तसेच प्यावे लागणार आहे. हे औषध दिवसातून दोन वेळा घ्यावे लागणार आहे. कोरोना रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी हे औषध 5-7 दिवस घ्यावे लागणार आहे, असे डॉ. सुधीर चंदना यांनी सांगितले.
२ डीजीचे साईडइफेक्ट काय आहेत? (2 dg medicine side effect)चाचणीवेळी सामान्य कोरोनाबाधित आणि गंभीर रुग्णांवर याचा प्रयोग करण्यात आला. मात्र, सर्व रुग्णांना याचा फायदा झाला. सर्वांमध्ये अनुकूल प्रभाव दिसला.