नवी दिल्ली : गावी जाण्यासाठी पायपीट करणाऱ्या हजारो कामगारांना दिलासा देण्यासाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशात १००० बसेस चालविण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे. जेणेकरून या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचविले जाऊ शकेल.राज्याच्या प्रभारी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारला याबाबतचे पत्र दिले आहे आणि तात्काळ मंजुरी देण्याची मागणी केली आहे. यात प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, कामगारांना एकट्यांना सोडून देण्याची ही वेळ नाही.रोज होणाºया दुर्घटनांमुळे दु:खी झालेल्या प्रियांका गांधी यांनी या कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची व्यथा मांडताना सरकारला याची आठवण करून दिली की, आमचा पक्ष सातत्याने उत्तर प्रदेश सरकारकडे ही मागणी करत आहे; पण सरकार लक्ष देत नाही. परिणामी कामगार मृत्युमुखी पडत असल्याच्या बातम्या रोज येत आहेत.कामगारांना भोजन, निवारादुसºया राज्यातून पायी उत्तर प्रदेशच्या सीमेमध्ये प्रवेश करणाºया लोकांना काँग्रेसकडून मदत केली जात आहे. पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने राज्याच्या सीमेवर शिबिरे सुरूकेली आहेत. सर्व कामगारांची भोजन आणि अस्थायी निवाºयाची व अन्य सुविधा देण्याची व्यवस्था केली आहे.
CoronaVirus News : 1,000 बसचालविण्याचा प्रियांका गांधींचा प्रस्ताव, उत्तर प्रदेश सरकारकडे मागितली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 2:47 AM