नवी दिल्लीः आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार अन् सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. डॉ. आरुषी जैन यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने बुधवारी सुनावणी केली. या याचिकेत त्यांनी कोरोनाविरोधातील लढ्यात अग्रभागी लढत असलेल्या आरोग्य कर्मचार्यांना स्वतंत्रपणे सुविधा आणि वेळेवर वेतन देण्याची मागणी केली होती, ज्यात डॉक्टर आणि इतर संबंधित आरोग्य कर्मचार्यांचा समावेश होता.या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्यांना वेळेत पगार द्यावा, असे सांगून केंद्र सरकारने आधीच परिपत्रक जारी केले होते. त्यावर आता राज्यांचे मुख्य सचिव निर्णय घेऊ शकतात. या नियमाचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन झाल्यास शिक्षा होऊ शकते, असंही सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केलं आहे.
CoronaVirus News : आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:52 PM