शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
2
"निवडणुकीपूर्वी मोफत दिल्या जाणाऱ्या योजना म्हणजे लाच"; सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस
3
“CM एकनाथ शिंदेंनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे”; काँग्रेस नेत्याचा दावा
4
गोळीबार, धमकी आणि आता मित्राची हत्या...; सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार?
5
महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; 'असा' आहे संभाव्य फॉर्म्युला, सपा-शेकापला किती जागा?
6
IND vs NZ: न्यूझीलंडला मोठा धक्का! भारताविरूद्धच्या मालिकेतून वेगवान गोलंदाज OUT
7
“राज ठाकरे स्पष्टवक्ते, आम्ही त्यांच्यात बाळासाहेबांना पाहतो”; शिंदे गटातील नेत्याची भावना
8
90s मधला तो व्हिडिओ ठरला अतुल परचुरेंची शेवटची इन्स्टा पोस्ट, काही दिवसांपूर्वीच केलेला शेअर
9
अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर
10
काँग्रेसकडून भाजपाला धक्का, दोन माजी आमदारांचा कांग्रेसमध्ये प्रवेश
11
७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार
12
Rekha Jhunjhunwala Portfolio: वर्षभरात २८६% रिटर्न, चार दिवसांपासून 'या' शेअरमध्ये मोठी तेजी; तुमच्याकडे आहे का?
13
५ मिनिटं अभिनेत्रीला जबरदस्तीने किस करत राहिला सुपरस्टार; रडत राहिली हिरोईन
14
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
15
PM Internship Scheme : काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये
16
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
17
८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!
18
Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!
19
पाकिस्तानसह 'भारत'ही हरला! न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये; टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर
20
न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी

CoronaVirus News: मोठा दिलासा! 'त्या' व्यक्तींना लसीचा एकच डोस पुरेसा; इतरांपेक्षा कोरोनाचा कमी धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 7:52 PM

CoronaVirus News: काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा महत्त्वपूर्ण संशोधन अहवाल समोर

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ५० हजारांच्या खाली आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण अभियानाला वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी लसींचा साठा कमी असल्यानं लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अहवालातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. 

कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना लसीचा एक डोसदेखील पुरेसा आहे. कोरोनामुक्त झालेल्यांनी लसीचा एक किंवा दोन्ही डोस घेतल्यास त्यांना डेल्टा व्हेरिएंटपासून मिळणारं संरक्षण अधिक असतं, अशी माहिती आयसीएमआरच्या संशोधनातून पुढे आली आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होऊन गेलेल्यांनी लसीचा एक किंवा दोन्ही डोस न घेतल्यास त्यांना मिळणारं संरक्षण कोरोनाची लागण न झालेल्यांपेक्षा अधिक असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती संशोधन अहवालातून समोर आली आहे.

डेल्टा व्हेरिएंटविरोधात कोविशील्ड किती प्रभावी आहे ते तपासून पाहण्यासाठी आयसीएमआरकडून संशोधन करण्यात आलं. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हेरिएंटच कारणीभूत ठरला होता. देशातील बहुतांश नागरिकांनी कोविशील्डची लस घेतली असल्यानं आयसीएमआरकडून करण्यात आलेलं संशोधन महत्त्वाचं मानलं जात आहे. 

संशोधनातून समोर आलेली महत्त्वाची माहितीकोविशील्डचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींपैकी १६.१ टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटविरोधात अँटिबॉडी तयार न झाल्याचं संशोधन सांगतं. तर एक डोस घेतलेल्यांपैकी ५८.१ टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी आढळून आलेल्या नाहीत. अँटिबॉडी दिसून/आढळून न येणं आणि अँटिबॉडी तयार न होणं या दोन्ही बाबी वेगवेगळ्या असल्याचं वेल्लोरस्थित ख्रिश्चियन वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. जेकब जॉन यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं.

'कोविशील्डची लस घेतलेल्यांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या असाव्यात. मात्र त्यांचं प्रमाण कमी असल्यानं त्या डिटेक्ट झाल्या नसाव्यात. संबंधित व्यक्तीचा कोरोनापासून बचाव करू शकतील इतक्या अँटिबॉडीज त्याच्या शरीरात असू शकतात,' असं जॉन म्हणाले. '६५ वर्षांवरील व्यक्तींना मधुमेह, हायपरटेंशन, किडनी, हृदयासंबंधित अनेक गंभीर आजार असतात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अशा व्यक्तींना तिसरा डोस देण्याची गरज आहे,' असं जॉन यांनी सांगितलं.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या