नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे केंद्र सरकारही हादरून गेले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगड येथील स्थिती बिघडत चालली आहे.कुंभमेळ्यानंतर किमान ५० साधूसंतांना कोरोना झाला आहे. लागण झालेल्या बाधितांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. राज्यात कुंभमेळ्यामुळेच ही स्थिती उद्भवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद, वाराणसीसह अनेक शहरांत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे. तसेच सोमवारी सकाळपर्यंतही संचारबंदी लावण्यात येणार आहे. मास्क न लावणाऱ्याकडून एक हजार रुपये दंड आकारला जाईल. तसेच दुसऱ्यांदा तीच व्यक्ती मास्कविना आढळल्यास १० हजार दंड केला जाईल.
- २,१७,३५३ नवे रुग्ण २४ तासांत आढळले
- सलग दुसऱ्या दिवशी काेराेनाचे दाेन लाखांहून अधिक नवे रुग्ण- १ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू, सक्रिय रुग्णांची संख्या १५ लाखांवर.
दुसऱ्या लाटेत संसर्ग अतिशय वेगाने पसरत आहे. भारतात सलग दुसऱ्या दिवशी दाेन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले. २४ तासांमध्ये ११८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यूपीची स्थिती वाईटाकडेकेंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. तेथे केंद्रीय पथक जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे