शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

CoronaVirus News: तज्ज्ञ डॉक्टरांना दिवसाला मिळणार १० हजार रुपये; 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 6:16 PM

CoronaVirus News: कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू; लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या घटेना

चंदिगढ: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं वैद्यकीय यंत्रणेवर खूप मोठा ताण आहे. हरयाणात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यातील आरोग्य सोयी सुविधा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे हरयाणा सरकारनं काही तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या डॉक्टरांना दररोज १० हजार रुपये वेतन देण्यात येईल. कोरोना संकटात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर तासाला १ हजार २०० रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.उत्तर भारतात कोरोनाचा 'ब्रिटन व्हेरिएंट', तर महाराष्ट्र-कर्नाटक-गुजरातमध्ये 'डबल म्युटंट'चा हाहाकारहरयाणातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारनं काही ठिकाणी कठोर निर्बंध लागू केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार काही साथरोग तज्ज्ञांची मदत घेणार आहे. राज्य सरकार राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या (एनएचएम) अंतर्गत तज्ज्ञांची भरती करणार आहे. राज्याला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोना संकटात नोकरीच्या संधी! आरोग्य विभागात १६ हजार पदांसाठी मेगाभरतीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र अद्याप तरी राज्यातील कोरोनाचा कहर थांबलेला नाही. राज्यात लॉकडाऊन लागू असूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. उलट लॉकडाऊनमध्ये ती अधिक वाढत आहे. राज्यातील संक्रमणाचा दर ७.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७९.१० टक्के इतकं आहे. राज्यातील मृत्यूदर ०.८८ टक्के इतका आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या