बंगळुरु : कर्नाटकमध्ये यापुढे फक्त रविवारी राज्यव्यापी ‘लॉकडाउन’ लागू राहील. इतर दिवशी फक्त ‘कन्टेन्मेंट झोन’मध्ये ‘लॉकडाउन’ असेल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सोमवारी येथे जाहीर केले. ‘कन्टेन्मेंट झोन’ वगळून उर्वरित राज्यातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होतील. मात्र महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू व केरळ या चार राज्यांमधील लोकांना कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असेही येडियुराप्पा म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले, की कर्नाटकच्या सीमांच्या आत रेल्वेगाड्या सुरू होतील. तसेच ‘रेड’ व ‘कन्टेन्मेंट झोन’ वगळून राज्यात इतर सर्व ठिकाणी राज्याच्या एसटी बस धावू लागतील. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने सुरू असतील, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
CoronaVirus News : कर्नाटकात फक्त रविवारीच राज्यव्यापी ‘लॉकडाउन’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 4:00 AM