नवी दिल्ली : लॉकडाऊनसारख्या कठोर निबंर्धांचा वापर केल्याने भारतात कोरोना प्रसारास आळा बसल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. लव अगरवाल यांनी केला.लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण केवळ ७.१ टक्के होते. दुसऱ्या टप्प्यात भारताने ११.४२ टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याचा दर नेला. तिसºया टप्प्यात २६.५९ तर चौथ्या टप्प्यात आतापर्यंत ४१.६१ टक्के रुग्ण बरे होत आहेत.
मृत्यूदरही कमी झाला आहे. तिसºया लॉकडाऊनमधील मृत्यूचे प्रमाण आता २.८७ वर स्थिरावले आहे. जगात सरासरी ६९.९ जणांना एक लाख लोकांमागे कोरोनाची लागण होते. भारतात हे प्रमाण १०.७ आहे. मृत्यूदर जगात सरासरी ६.४ असून भारतात तो सर्वात कमी अर्थात २.८७ टक्के आहे. फ्रान्समध्ये १९.९ , इटलीत १४.३ तर बेल्जियममध्ये १६.३ टक्के मृत्यूदर आहे. दर लाख रुग्णांमागे भारतात मृत्यू होण्याचे प्रमाण ०.३ टक्के असून जगाची सरासरी ४.५ टक्के इतकी आहे.