शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

CoronaVirus News: कोरोना मृत्यूंमागचं 'खरं' कारण समोर; ६०% रुग्णांच्या मृत्यूबद्दल धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 8:48 AM

CoronaVirus News: संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती; कोरोना रुग्णांवरील उपचार पद्धतीत मोठी त्रुटी?

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात ३ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमागचं प्रमुख कारण जर्नल इंफेक्शन अँड ड्रग रेसिस्टंसमध्ये प्रकाशित झाला आहे. कोरोना काळात रुग्णांवर एँटीबायोटिक्सचा बेसुमार वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात सुपरबग तयार होतो. परिणामी बॅक्टेरियल आणि फंगल इंफेक्शन वेगानं वाढतं अशी माहिती संशोधन अहवालातून समोर आली आहे.ऑक्सिजनची पातळी ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ‘ती’ परतलीकोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये एँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. सूक्ष्मजीवांना (बॅक्टेरिया) निष्प्रभ करण्यासाठी एँटीबायोटिक्स वापरली जातात. मात्र एँटीबायोटिक्सचा अधिक वापर झाल्यास सूक्ष्मजीव त्यांच्याविरोधात प्रतिरोधक क्षमता विकसित करतात. त्यामुळे एँटीबायोटिक्स औषधांचा परिणाम होत नाही, अशी माहिती जर्नल इंफेक्शन अँड ड्रग रेसिस्टंसनं समोर आणली आहे.कोरोनावर परिणामकारक कॉकटेल ड्रगचा भारतात वापर; ७० टक्के प्रभावी असल्याचा दावाकोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान रुग्णालयांत भरती झालेल्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शन आढळून आलं होतं. हे इंफेक्शन औषधांना निष्प्रभ करणारे सूक्ष्मजीव पसरवत होते. याबद्दलची माहिती गोळा करण्यासाठी संशोधकांनी देशातील १० रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या १७ हजार ५६३ रुग्णांचा अभ्यास केला. संशोधनानुसार बॅक्टेरिया आणि फंगसनं संक्रमित झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या २८ टक्के होती. सूक्ष्मजीवांनी अँटीबायोटिक्स निष्प्रभ केल्यानं कोरोना रुग्णांना बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शनची लागण झाली होती.संशोधन अहवालातील माहितीनुसार, कोरोना रुग्णांमध्ये एँटिबायोटिक्समुळे अतिरिक्त संक्रमण झालं. देशातील ६० टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू याच कारणामुळे झाला. त्यामुळे ६० टक्के मृत्यूंना केवळ बॅक्टेरिया आणि फंगसमुळे तयार झालेला सुपरबग कारणीभूत ठरला. या सुपरबगची शिकार न झालेल्यांपैकी केवळ ११ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश जण मधुमेह आणि रक्तदाब या समस्यांचा सामना करत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या